Advertisement

शिवाजी पार्क जिमखान्यावर मुख्यमंत्र्यांची बॅटिंग...


शिवाजी पार्क जिमखान्यावर मुख्यमंत्र्यांची बॅटिंग...
SHARES

एरव्ही राजकीय मैदानावर बॅटिंग करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी अाज शिवाजी पार्क जिमखान्यावर यथेच्छ फलंदाजी केली. शिवाजी पार्क जिमखान्यावर सुरू असलेल्या रमाकांत देसाई, विजय मांजरेकर स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेनिमित्ताने शनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी जिमखान्याला सदिच्छा भेट दिली. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहा खेळाडूंना जिमखान्याच्या वतीनं क्रीडा शिष्यवृत्ती सुपूर्द करण्यात अाली.


मुख्यमंत्री काय म्हणाले...

१०० वर्षे पेक्षा जुन्या एेतिहासिक अशा शिवाजी पार्क जिमखान्यावर येण्याची संधी मला प्राप्त झाली. ज्यांनी देशाला महान क्रिकेटपटू दिले अशा मोठ्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या संस्थेत येण्याचे भाग्य मला लाभले. जिमखान्याच्या वाॅल अाॅफ फेमवर या क्लबनं तयार केलेल्या क्रिकेटपटूंची नाव बघितली की थक्क व्हायला होतं. खेळासाठी चांगल्या पायाभूत सोयीसुविधा असणं गरजेचं असतं. पण त्यासाेबत खेळाडू निर्माण करण्याकरिता प्रामाणिक अाणि फोकस दृष्टिकोन लागतो. अशाच प्रकारची प्रामाणिकता १०९ वर्ष विविध क्रीडापटू घडवण्याचं काम शिवाजी पार्क जिमखान्यानं केलं अाहे, असंही त्यांनी सांगितलं.


रमाकांत देसाईंच्या स्मृतींना दिला उजाळा

विजय मांजकेर अाणि रमाकांत देसाई ही भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ही दोन अजरामर नावं. ती याच मैदानावर तयार झाली, ही याचा अभिमान वाटतो. मला अाठवतं, सुनील गावस्कर वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावरून अाले होते. ४ कसोटीत त्यांनी ७७४ धावा फटकावल्या होत्या. मुंबईत एका सामन्यात ते खेळणार होते. जबरदस्त फाॅर्ममध्ये असणाऱ्या गावस्करांना कोण अाऊट करेल, हाच प्रश्न सर्वांना पडला होता. त्यावेळी रमाकांत देसाई निवृत्त झाले होते. पण त्यांच्या एका इनस्विंगरने गावस्करांचा त्रिफळा उद्ध्वस्त केला, अशी अाठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली.


मुख्यमंत्र्यांना जिमखान्याचे सदस्यत्व

शिवाजी पार्क जिमखान्याचे विश्वस्त मिलिंद सबनीस यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिमखान्याचे सदस्यत्व देण्यात अाले. हे सदस्यत्व दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जिमखान्याचे अाभारही मानले. ही मेंबरशिप दिल्याबद्दल मी जिमखान्याचा अाभारी अाहे. या मेंबरशिपचा मी कधीही दुरुपयोग करणार नाही, चांगल्या लोकांनाच मतदान करेन, अशी कोपरखळीही मुख्यमंत्र्यांनी मारताच संपूर्ण सभागृहात हास्यकल्लोळ माजला.


हेही वाचा -

एसपीजी टी-२०- मुंबई पोलीस अंतिम फेरीत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा