Advertisement

एसपीजी टी-२०- मुंबई पोलीस अंतिम फेरीत


एसपीजी टी-२०- मुंबई पोलीस अंतिम फेरीत
SHARES

विजय मांजरेकर व रमाकांत देसाई स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेची मुंबई पोलीस जिमखाना विरुद्ध डॉ. डी. वाय पाटील स्पोर्टस अकादमी यांच्यातील उपांत्य फेरीची लढत रंगतदार झाली. ४ चेंडूंत २ धावांची अावश्यकता असताना मुंबई पोलीस संघाच्या क्षेत्ररक्षकांनी डी. वाय. पाटीलच्या फलंदाजाला धावचीत केलं अामि एका धावेने विजय मिळवून अंतिम फेरीत मजल मारली. अाता रविवारी दुपारी रंगणाऱ्या अंतिम फेरीत त्यांची गाठ पय्याडे स्पोर्टस क्लबशी पडेल. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पय्याडे स्पोर्टस क्लबनं यजमान शिवाजी पार्क जिमखान्याचा सहज पराभव करून अंतिम फेरीतील अापलं स्थान निश्चित केलं.


मुंबई पोलीसांची हाराकिरी

प्रथम फलंदाजी करताना मुंबई पोलीस जिमखाना संघाच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. फिरकीपटू प्रवीण तांबे अाणि प्रशांत भोईर यांच्या गोलंदाजीसमोर मुंबई पोलिसांच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या रचण्यात अपयश अाले. सलामीवीर जय बिश्त (३७ धावा), चिराग खुराना (१७ धावा) व अग्नि चोप्रा (१५ धावा) यांच्या योगदानामुळे मुंबई पोलिसांना २० षटकांत ९ बाद १३० धावा उभारता अाल्या. प्रवीण तांबे अाणि प्रशांत भोईरने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या.


डी. वाय. पाटीलची फलंदाजी गडगडली

विजयी लक्ष्य सोपं असतानाही डाॅ. डी. वाय. पाटील स्पोर्टस अकादमीच्या फलंदाजांनी मुंबई पोलिसांसमोर गुडघे टेकले. संघाचे खाते खोलण्यापूर्वीच डी. वाय. पाटीलची सलामीची जोडी माघारी परतली. संतोष शिंदेने पाच विकेट्स मिळवत डी. वाय. पाटील संघाचे कंबरडे मोडले. त्याला योगेश जगतापने सुरेख साथ देत तीन विकेट्स मिळवल्या. त्यामुळे डी. वाय. पाटीलची अवस्था ८ बाद २० अशी बिकट झाली होती.


कर्श कोठारीची झुंज अपयशी

तळाचे फलंदाज कर्श कोठारीने प्रशांत भोईरच्या साथीने नवव्या विकेटसाठी ४४ धावांची तर विनित सिन्हाच्या साथीने शेवटच्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी रचून सामन्याला कलाटणी दिली. विजयासाठी ४ चेंडूंत २ धावांची अावश्यकता असताना एकेरी धाव घेण्याच्या नादात विनित सिन्हा धावचीत झाला अाणि कर्श कोठीरीच्या प्रयत्नांवर पाणी फेरले. कर्शने नाबाद ३५, प्रशांत भोईरने २४ तर सिन्हाने ४५ धावांची खेळी केली.


हेही वाचा -

शिवाजी पार्क जिमखाना टी-२० स्पर्धा २२ मार्चपासून

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा