Advertisement

शिवाजी पार्क जिमखाना टी-२० स्पर्धा २२ मार्चपासून


शिवाजी पार्क जिमखाना टी-२० स्पर्धा २२ मार्चपासून
SHARES

जवळपास शतकभरापासून मुंबईलाच नव्हे तर देशाला अाणि जगाला सर्वोत्तम क्रिकेटपटू देणाऱ्या शिवाजी पार्क जिमखान्यातर्फे २२ ते २५ मार्चदरम्यान टी-२० क्रिकेट स्पर्धेचे अायोजन करण्यात अाले अाहे. महान क्रिकेटपटू विजय मांजरेकर अाणि रमाकांत देसाई यांच्या स्मरणार्थ दरवर्षी या टी-२० क्रिकेट स्पर्धेचे अायोजन करण्यात येते. दादर पश्चिम येथील शिवाजी पार्क जिमखाना ग्राउंडवर भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू रमेश पोवार याच्या हस्ते २२ मार्च रोजी सकाळी ९ वाजता या स्पर्धेचे उद्धाटन करण्यात येणार अाहे.


कोणते संघ सहभागी?

विजय मांजरेकर अाणि रमाकांत देसाई स्मृती टी-२० क्रिकेट स्पर्धेत नॅशनल क्रिकेट क्लब, कर्नाटक स्पोर्टस असोसिएशन, मुंबई पोलीस जिमखाना, डाॅ. डी. वाय. पाटील स्पोर्टस असोसिएशन, पय्याडे स्पोर्टस क्लब, पार्कोफिन क्रिकेट क्लब, न्यू हिंद, दादर यूनियन स्पोर्टिंग क्लब, सिंद स्पोर्ट्स क्लब अाणि शिवाजी पार्क जिमखाना हे मुंबईतील मातब्बल १० संघ सहभागी होणार अाहेत.


बक्षिसांचा वर्षाव

या स्पर्धेत सहभागी होणारे संघ एक लाख रुपयांच्या विजेतेपदासाठी एकमेकांसाठी झुंजतील. अंतिम फेरीत हार पत्करणाऱ्या उपविजेत्या संघाला ५० हजार रुपयांच्या पारितोषिकावर समाधान मानावे लागेल. त्याचबरोबर मॅन अाॅफ द सिरिज, सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम गोलंदाज अाणि मॅन अाॅफ द फायनल अशी अाकर्षक बक्षिसे दिली जाणार अाहेत. भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा पार पडणार अाहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा