Advertisement

भावा तुझ्या कार्याला सलाम! ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी 'या' खेळाडूनं केली ३७ लाख रुपयांची मदत


भावा तुझ्या कार्याला सलाम! ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी 'या' खेळाडूनं केली ३७ लाख रुपयांची मदत
SHARES

भारतात कोरोनाचा (coronavirus) विस्फोट झाला असून रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रुग्णांना उपचारासाठी बेड्स उपलब्ध होत नाहीत. लसीचाही मोठा तुटवडा निर्माण होत आहे. शिवाय ऑक्सिजनचीही कमतरता भासत आहे. अशी गंभीर परिस्थिती भारतात असताना आयपीएल (ipl 2021) खेळवली जात आहे. त्यामुळं या आयपीएलच्या आयोजनावरून टीका केली जात आहे. सर्वच स्थरावरून टीका होत आहेत. मात्र असं असलं तरी या आयपीएल स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा जलद गोलंदाज पॅट कमिन्स (pat Cummins) यानं भारतासाठी मदतीचा हात पुढे केला. पॅट कमिन्सननं सामाजिक भान जपत भारतातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी ५० हजार डॉलर म्हणजेच ३७ लाख ३६ हजार रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिले आहेत.

पॅट कमिन्सनं यासंदर्भात एक मोठा मेसेज लिहिला असून, त्यानं आपल्याला भारत अतिशय प्रिय असून मी माझ्या आयुष्यातील काही सर्वात चांगल्या लोकांना या देशात भेटल्याचं म्हटलं आहे. तसंच, या संकटाच्या काळामध्ये आयपीएलसारख्या स्पर्धांच्या आयोजनामधून देशातील लोकांना थोडा विरंगुळा मिळेल असा सरकारचा या स्पर्धेच्या आयोजनाला परवानगी देण्यामागील दृष्टीकोन असल्याचंही कमिन्सनने म्हटलं आहे. इतकच नाही तर कमिन्सननं आयपीएलमध्ये खेळणाऱ्या जगभरातील इतर खेळाडूंनीही पुढाकार घेत या संकटाच्या काळामध्ये मदत निधी द्यावा आणि मदतीसाठी पुढे यावं असं आवाहन केलं आहे.

लोकांनी आपल्या भावानांचा योग्यपद्धतीन त्यांच्या कामामध्ये वापर केल्यास बदल नक्की घडेल आणि या परिस्थितीवर मात करणं शक्य होईल असंही कमिन्सन म्हणाला आहे. मी केलेली मदत फार नाहीय पण त्यामुळे काही लोकांच्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल अशी मला आशा आहे, असंही कमिन्सनने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कमिन्सनच्या या ट्विटनंतर सर्वच स्तरातून त्याचं कौतुक केलं जात आहे. सोशल मीडियावर त्याचं ट्विट व्हायरल झालं आहे. एक लाखांहून अधिक जणांनी ते लाईक केलं असून हजारो लोकांनी त्यावर कमेंट करत कमिन्सनने केलेल्या मदतीसाठी त्याचे आभार मानले आहेत. अनेकांनी कमिन्सनकडून इतर खेळाडूंनी प्रेरणा घेण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा