Advertisement

पृथ्वी म्हणतो, 'मी अांतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज'


पृथ्वी म्हणतो, 'मी अांतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज'
SHARES

भारताला १९ वर्षांखालील चषक जिंकून देणारा मुंबईचा वंडरबाॅय पृथ्वी शाॅ अाता अांतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज झाला अाहे. कुमार गटातील विश्वचषक जिंकल्यानंतर पृथ्वीसमोर व्यावसायिक क्रिकेटचे अाव्हान असले तरी यापुढे येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करणार असल्याचा अाणि स्वतःवर अधिक दडपण न घेणार असल्याचे पृथ्वी शाॅने सांगितले.


व्यावसायिक क्रिकेटसाठी सज्ज

माझ्या मते, मी व्यावसायिक क्रिकेटसाठी सज्ज झालो अाहे. मी माझी कामगिरी चोखपणे बजावली अाहे. अाता मी किती धावा फटकावतो, तसंच कितपत तंदुरुस्त राहतो, यावर माझं व्यावसायिक क्रिकेटमधील भवितव्य अवलंबून राहील. निवड समितीचं माझ्या कामगिरीवर लक्ष अाहेच. पण मी अाता मिळणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करणार अाहे, असंही पृथ्वी शाॅ म्हणाला.


रणजी पदार्पणात नर्व्हस  

रणजी करडंक स्पर्धेत २०१६-१७च्या उपांत्य फेरीत तामिळनाडूविरुद्ध मी पदार्पण केलं होतं. त्या सामन्यात माझ्यावर काहीसं दडपण होतं. तसंच U-19 अाशिया चषक स्पर्धेतही मी नर्व्हस होतो. अाशिया चषक जिंकून मी मुंबईत पोहोचल्यानंतरच मला निवड समितीनं रणजी सामन्यासाठी बोलावलं होतं. पहिल्या इनिंगमध्ये मी फेल ठरलो, मात्र दुसऱ्या डावात १२० धावा फटकावून मी त्याची भरपाई केली होती.


अायपीएलसाठी उत्सुक

दिल्ली डेअरडेव्हिल्सने यंदाच्या अायपीएलसाठी पृथ्वी शाॅवर १.२ कोटी रुपयांची बोली लावली अाहे. अापल्या या नव्या इनिंगबद्दल पृथ्वी म्हणाला, ''अाता या सर्व गोष्टी हाताळण्यासाठी मी चांगलाच परिपक्व झालो अाहे. पण चुकीच्या वाटेवर जाणार नाही, याची काळजी मी नक्कीच घेईन. अायपीएलमध्ये खेळण्याचाही मला अनुभव मिळणार अाहे. त्याचबरोबर रिकी पाँटिंग, प्रवीण अमरे यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंशी अाणि अन्य सपोर्ट स्टाफसोबत माझ्या खेळाविषयी चर्चा करून कामगिरीत सुधारणा करता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी दिल्ली डेअरडेव्हिल्सतर्फे खेळण्यासाठी उत्सुक अाहे.''


हेही वाचा -

अवघ्या १९ वर्षांचा पृथ्वी झाला कोट्यधीश, दिल्ली डेअरडेव्हिल्सची १.२ कोटींची बोली

विरार ते भारताचा U-19 कर्णधार, ‘वंडर बाॅय' पृथ्वी शाॅची संघर्षगाथा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा