Advertisement

मुंबईला पराभूत करून पुणे पहिल्यांदाच आयपीएलच्या फायनलमध्ये


मुंबईला पराभूत करून पुणे पहिल्यांदाच आयपीएलच्या फायनलमध्ये
SHARES

वानखेडे स्टेडिअमवर मंगळवारी झालेल्या आयपीएल 10 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुणतालिकेत अव्वल संघ असलेल्या मुंबई इंडियन्सचा पराभव करत रायझिंग पुणे सुपरजायंट संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. पुण्याच्या विजयासाठी सलामीवीर अजिंक्य रहाणे (56 धावा), मनोज तिवारी (58) आणि एमएस धोनीने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. विशेष म्हणजे धोनी आणि तिवारीने फक्त दोन षटकात 41 धावा केल्या. ज्यामध्ये एकट्या धोनीने 26 धावा केल्या. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने चार षटकात 16 धावांत मुंबईच्या तीन फलंदाजांना बाद करत चमकदार कामगिरी केली. तो सामनावीरही ठरला. शार्दुल ठाकूरने दोन बळी तर जयदेव उनाडकट आणि लॉकी फर्ग्युसनने प्रत्येकी एक गडी मिळवून विजयात मोलाची कामगिरी बजावली.

पुण्याने विजयासाठी ठेवलेल्या 163 धावांचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 20 षटकांत 9 गडी बाद 142 धावांमध्ये गारद झाला. त्यामुळे रायझिंग पुणेने 20 धावांनी मुंबईला पराभूत केले. पार्थिव पटेलने 40 चेंडूंत 52 धावा केल्या. त्यात 3 चौकार आणि 3 षटकार लगावले. पटेलने 37 चेंडूंत 50 धावा केल्या. लेन्डल सिमन्स (5), कर्णधार रोहित शर्मा (1) हे बॅट्समन्स मात्र स्वस्तात बाद झाले.

पण मुंबई इंडियन्सकडे अजूनही फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. मुंबईला कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात 17 मे रोजी होणाऱ्या सामन्यातील विजेत्या संघासोबत पुन्हा सामना खेळावा लागेल. तो सामना जर मुंबईने जिंकला, तर मुंबईला फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा