रणजी ट्रॉफी : मुंबईचा दणदणीत विजय

 Pali Hill
रणजी ट्रॉफी : मुंबईचा दणदणीत विजय

मुंबई - गतविजेत्या मुंबईनं उत्तर प्रदेशवर 121 धावांनी दणदणीत विजय मिळवत यंदाच्या हंगामातलं पहिलं स्थान आणखी मजबूत केलंय. निर्णायक विजयाचे 6 गुण वसूल करणारा मुंबईचा संघ आता 25 गुणांसह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. म्हैसूरच्या वाडियार स्टेडियममध्ये रंगलेला हा सामना चांगलाच चुरशीचा झाला. पहिल्या डावात 233 धावांत गारद झाल्यावरही मुंबईनं हिंमत हारली नाही. उत्तर प्रदेशला पहिल्या डावात 225 धावांवर रोखल्यावर दुसऱ्या डावात 286 धावा करणाऱ्या मुंबईनं विजयासाठी प्रतिस्पर्ध्यांना 295 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण उत्तर प्रदेशचे 5 फलंदाज आदित्य धुमाळच्या फिरकीवर बाद झाले आणि त्यांचा डाव 173 धावांतच गडगडला. त्याला विशाल दाभोळकरनं 4 बळी घेत चांगली साथ दिली. दुसऱ्या डावात 90 धावांची खेळी करणारा मुंबईचा सूर्यकुमार यादव सामनावीर ठरला.

Loading Comments