Advertisement

मुंबईकर रोहित शर्माची द्विशतकाची हॅटट्रिक


मुंबईकर रोहित शर्माची द्विशतकाची हॅटट्रिक
SHARES

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत सध्या भारतीय क्रिकेट टीमची धुरा सांभाळणाऱ्या कॅप्टन रोहित शर्मानं मोहाली इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यामध्ये द्विशतकाची हॅटट्रिक साजरी केली. वन-डेमध्ये तीन द्विशतक झळकावणारा रोहित शर्मा हा क्रिकेट जगतातील एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे.

सलामीला आलेल्या रोहितनं ५० षटकं खेळून काढत चौकार-षटकारांची आतषबाजी करत १५३ चेंडूंमध्ये २०८ धावा केल्या. या इनिंगमध्ये त्याने १३ खणखणीत षटकार आणि १२ चौकार लगावले. टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा भारतीय संघाचा निर्णय अचूक ठरला. भारतीय फलंदाजांनी श्रीलंकन गोलंदाजांची पिसं काढत ५० षटकांमध्ये ४ विकेट्सच्या मोबदल्यात ३९२ धावा उभारल्या. 


श्रेयसचं पहिलं अर्धशतक

कारकिर्दीतील दुसरा एकदिवसीय सामना खेळणाऱ्या मुंबईकर श्रेयस अय्यरने ७० चेंडूंमध्ये ८८ धावा करत कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक साजरं केलं. या खेळीत त्यानं ९ चौकार आणि २ षटकार ठोकले. त्याशिवाय त्याने रोहितसह दुसऱ्या विकेटसाठी २१३ धावांची भागीदारीही रचली.



यापूर्वीची २ द्विशतकं

यापूर्वी रोहितनं बंगळुरू इथं २ नोव्हेंबर २०१३ रोजी आस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्यांदा द्विशतक (२०९ रन्स) झळकावलं होतं. या इनिंगमध्ये त्याने १६ षटकार मारून एका मॅचमध्ये सर्वाधिक सिक्सर मारण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला होता.

त्यानंतर १३ नोव्हेंबर २०१४ रोजी कोलकातातील ईडन गार्डन्सवर रंगलेल्या श्रीलंकेविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात दुसरं द्विशतक (२६४) झळकावत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या विश्वविक्रमाची नोंद केली होती. 


सचिन, वीरेंद्र सेहवागचीही द्विशतके

रोहित शर्माच्या अाधी सचिन तेंडुलकर (२०० धावा) अाणि वीरेंद्र सेहवाग (२१९) यांनीही द्विशतकी खेळी केली होती. त्यामुळे द्विशतक फटाकावणारा रोहित ही तिसरा भारतीय फलंदाज अाणि तीन द्विशतकं झळकावणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला अाहे. 


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा