Advertisement

विराट कोहली कर्णधारपद सोडणार?

टीम इंडियामध्ये येत्या काही महिन्यांत मोठा फेरबदल होणार आहे. सध्याचा कर्णधार विराट कोहली ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 वर्ल्डकप नंतर वनडे आणि टी20 च्या कर्णधारपद सोडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विराट कोहली कर्णधारपद सोडणार?
SHARES

टीम इंडियामध्ये येत्या काही महिन्यांत मोठा फेरबदल होणार आहे. सध्याचा कर्णधार विराट कोहली ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 वर्ल्डकप नंतर वनडे आणि टी20 च्या कर्णधारपद सोडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विराट कोहलीनंतर भारतीय संघाची धूरा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माकडं सोपवण्यात येणार असल्याचंही म्हटलं जात आहे. विराट कोहलीनं गेल्या काही महिन्यांत रोहित शर्मा आणि टीम इंडियाच्या प्रशासनाशी दीर्घ काळ चर्चा केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियानं विजय मिळविला त्यानंतर विराट पिता बनला त्यावेळी त्याने ही चर्चा केली आहे. यामुळे बीसीसीआयने देखील यावर विचार करण्यास सुरुवात केली असून तयारी देखील सुरु केली आहे.

विराट कोहली हा सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार आहे. विराट कोहलीने रोहित शर्माकडे भारतीय संघाची धुरा सोपविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. कसोटी, वन डे आणि २०-२० अशा तिन्ही प्रकारात कर्णधारपद सांभाळायचं असल्यानं विराटच्या फलंदाजीवर त्याचा परिणाम जाणवत आहे.

या तिन्ही प्रकाराता त्याच्या फलंदाजीला अधिक वेळ आणि वेग देण्याची गरज त्याला वाटत आहे. तसंच येत्या काळात २०२२ आणि २०२३ मध्ये भारतीय संगाला २ वर्ल्ड कप खेळायचे आहेत. यामुळं विराटला त्याच्यावरील जबाबदारी कमी करायची आहे. जर रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपविण्यात आले तर त्याच्या कामगिरीकडे पहावे लागेल. त्याने आयपीएलमध्ये ५ वेळा चषक जिंकला आहे. टी-२० मध्ये देखील कर्णधारपद भूषविले आहे आणि सामने जिंकले आहेत. यामुळे रोहितकडे कर्णधारपद देण्याची ही योग्य वेळ असल्याचे बीसीसीआय पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच रोहित आणि विराट यांचे चांगले जमते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा