Advertisement

साकिब रिझवी अांतर-महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा शुक्रवारपासून


साकिब रिझवी अांतर-महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा शुक्रवारपासून
SHARES

अाठव्या साकिब रिझवी स्मृती अांतर-महाविद्यालयीन फिरता चषक क्रिकेट स्पर्धेला शुक्रवार १५ डिसेंबरपासून सुरुवात होणार असून यात ४२ महाविद्यालये भाग घेणार अाहेत. ज्युनियर काॅलेज स्पोर्टस असोसिएशन अाॅफ मुंबई अाणि रिझवी एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेतील पहिल्या फेरीचे सामने माटुंगा येथील दडकर मैदानावर होतील. गतविजेता रिझवी काॅलेज अाणि गेल्या वर्षीचा उपविजेता अार. ए. पोदार काॅलेज यांना पहिल्या फेरीत बाय देण्यात अाली अाहे.


मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेतील सामने एमसीएच्या नव्या नियमांनुसार बाद फेरीप्रमाणे खेळवण्यात येणार अाहेत. पहिल्या फेरीपासून ते उपांत्यपूर्व फेरीपर्यंतचे सामने ४५ षटकांचे अाणि एका दिवसाचे असतील. उपांत्य अाणि अंतिम फेरीचा सामना दोन दिवसांचा असेल.


रिझवी एज्युकेशन सोसायटीने नेहमीच खेळाला अाणि खेळाडूंना प्रोत्साहन दिले अाहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ही स्पर्धा त्याच जोशाने खेळली जाईल अाणि रिझवी संस्था व त्यांच्या खेळाडूंच्या याेगदानाची अाठवण करून देणारी असेल.

- रुबिना रिझवी, रिझवी एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा