क्रिकेट सामन्यात 'सौरव 11' विजयी


SHARE

मस्जिद - शिवसेना शाखा क्र. 224 तर्फे क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलं होतं. यात सौरव 11 या संघानं चषक जिंकत शिवसेनाप्रमुख चषकावर नाव कोरले. शिवसेना पूर्व शाखाप्रमुख हेमंत कोळी आणि शाखाप्रमुख स्वप्नील कोळी यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं. या आयोजनाचं यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. यंदा 16 संघ सहभागी झाले होते. ओम साई मित्र मंडळ, मांडवी क्रिकेट क्लब असे विविध संघ यामध्ये दाखल झाले होते. त्यातील सौरव 11, रीओ 11, जिया 11 आणि विक्रोलीयन सेमी फायनलमध्ये दाखल झाले होते. त्यात 3 षटकात 35 धावांचा पाठलाग करत असताना सौरव 11 च्या संघातील राहुल माने यानं एका षटकात 16 धावा करून आपल्या संघाला रीओ 11 विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून दिला. 17 आणि 18 डिसेंबरला या सामन्याचं अायोजन केलं होतं. 17 डिसेंबर रात्री 9 ते 12 दरम्यान झालेल्या फेरीमध्ये 4 सामने खेळवले गेले. तर 18 डिसेंबरच्या दिवसभरात इतर क्लॉक आऊट पद्धतीनं खेळवले गेले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या