Advertisement

स्पोर्टिंग क्लब उपांत्य फेरीत


स्पोर्टिंग क्लब उपांत्य फेरीत
SHARES

दादोजी कोंडदेव स्टेडियमवर झालेल्या पालकमंत्री चषक स्पर्धेत स्पोर्टिंग क्रिकेट क्लबने युनियन क्रिकेट क्लबचा 11 धावांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली. मनोज यादवचे (56 धावा) अर्धशतक व जलदगती गोलंदाज रणजीपटू आकिब शेखचे 16 धावांत 4 बळी यामुळे स्पोर्टिंग क्रिकेट क्लबचा विजय सुकर झाला. युनियन क्रिकेट क्लबचा पराभव टाळण्यासाठी शिरीष मोरे (42 धावा) व डावखुरा फिरकी गोलंदाज रणजीपटू मधुसूदन आचार्य (32 धावांत 3 बळी) यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण ते संघाचा पराभव टाळू शकले नाही.

पहिली फलंदाजी करणाऱ्या स्पोर्टिंग क्रिकेट क्लबचा अर्धा संघ 21 धावांत तंबूत परतला होता. त्यानंतर मनोज यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर स्पोर्टिंग क्लबने 20 षटकांत 126 पर्यंत मजल मारली.

युनियन क्लबचे गोलंदाज मधुसूदन आचार्य (32 धावांत 3 बळी), हर्शल सोनी (15 धावांत 2 बळी), अजय पांडे (28 धावांत 2 बळी), सागर मिश्रा (23 धावांत 2 बळी) यांनी उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले.

127 धावांचा पाठलाग करताना युनियन क्रिकेट क्लबचे भरवशाचे चार फलंदाज स्पोर्टिंग क्लबच्या आकीब शेखने (16 धावांत 4 बळी) झटपट बाद केले आणि त्यांची अवस्था 4 बाद 16 धावा अशी बिकट केली. शिरीष मोरे (42 धावा) व तुषार देशपांडे (23 धावा) यांनी सहाव्या विकेटसाठी 49 धावांची बहुमोल भागीदारी केली. त्यानंतर अजय पांडेने 21 धावा करून युनियन क्लबला विजयाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला. परंतु स्पोर्टिंगच्या आकीबसह सैफ शेख, सर्वेश लोकेगावकर, श्रावण तावडे यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर युनियन क्रिकेट क्लबचा डाव 18.2 षटकात 115 धावसंख्येवर गुंडाळला आणि स्पोर्टिंग क्लबला 11 धावांचा शानदार विजय मिळला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा