Advertisement

'टाटा' आयपीएल २०२२; लीगचा नवा टायटल स्पॉन्सर

टाटा ग्रुपने टायटल स्पॉन्सर म्हणून विवोची जागा घेतली आहे. त्यानुसार, आता या लीगचे नाव 'टाटा' आयपीएल म्हणून ओळखले जाणार आहे.

'टाटा' आयपीएल २०२२; लीगचा नवा टायटल स्पॉन्सर
SHARES

इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2022) १५व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. नुकतच टाटा ग्रुपने टायटल स्पॉन्सर म्हणून विवोची जागा घेतली आहे. त्यानुसार, आता या लीगचे नाव 'टाटा' आयपीएल म्हणून ओळखले जाणार आहे.

टायटल स्पॉन्सर मोबाईल कंपनी विवोने (VIVO) लीगच्या प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीतून मिळालेल्या माहितीनुसार, टाटा ग्रुपनं टायटल स्पॉन्सर म्हणून विवोची जागा घेतली आहे.

आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लीगसोबतच्या प्रायोजकत्व करारासाठी विवोकडे काही वर्षे शिल्लक आहेत, परंतु या काळात टाटा मुख्य प्रायोजक राहील.

विवोने २०१८ मध्ये वार्षिक ४४० कोटी रुपये खर्च करून टायटल हक्क विकत घेतले होते. बोर्ड आणि विवो यांच्यातील पाच वर्षांचा करार २०२० हंगामापर्यंत होता आणि एका वर्षाच्या ब्रेकमुळे २०२३ पर्यंत वाढवण्यात आला होता. 

मंगळवारच्या बैठकीनंतर, टाटा समूह २०२२ आणि २०२३ हंगामासाठी शीर्षक प्रायोजक म्हणून कायम राहील, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, विवोने आता आयपीएलचे अधिकार टाटाकडे हस्तांतरित केले आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा