सर्व सामने जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरू - विराट

 Mumbai
सर्व सामने जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरू - विराट

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्व सामने जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरु, असा ठाम निर्धार भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता. 1 जूनपासून इग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ बुधवारी रवाना होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांचा सामना नेहमी रोमांचक असतो. मात्र आम्हाला प्रत्येक सामना महत्त्वाचा असेल, असं सांगत त्याने माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि युवराज सिंह हे अनुभवी खेळाडू देखील खेळणार असल्याचं सागितलं.
4 जून रोजी भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना होणार आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक

1 जून - इंग्लंड वि. बांग्लादेश
2 जून - ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड
3 जून - श्रीलंका वि. दक्षिण अाफ्रिका
4 जून - भारत वि. पाकिस्तान
5 जून - ऑस्ट्रेलिया वि. बांग्लादेश
6 जून - न्यूझीलंड वि. इंग्लंड
7 जून - पाकिस्तान वि. दक्षिण अाफ्रिका
8 जून - भारत वि. श्रीलंका
9 जून - न्यूझीलंड वि. बांग्लादेश
10 जून - इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया
11 जून - भारत वि. दक्षिण अाफ्रिका
12 जून - श्रीलंका वि. पाकिस्तान
14 जून - पहिली सेमीफाइनल (A1 Vs B2)
15 जून - दुसरी सेमीफाइनल (A2 Vs B1)
18 जून - अंतिम सामना

Loading Comments