Advertisement

एकाच वेळी भारताचे दोन संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार

आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाच वेळी भारताचे दोन संघ खेळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २३ वर्षापूर्वी १९९८ मध्येही असंच घडलं होतं.

एकाच वेळी भारताचे दोन संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार
SHARES

कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा मध्येच स्थगित करण्यात आली आहे. त्यानंतर बीसीसीआयने जागतिक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. मात्र, या दरम्यान बीसीसीआयने जुलै महिन्यात श्रीलंकेचा दौराही आयोजीत केला आहे. त्यामुळे एकाच वेळी भारताचे दोन संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. 

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली आहे. भारतीय संघ जेव्हा श्रीलंका दौऱ्यावर जाईल तेव्हा भारताचा आणखी एक संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत असेल. कोरोना नियमामुळे भारतीय संघ इंग्लंडवरुन श्रीलंकेला येत मालिका खेळून परत इंग्लंडमध्ये कसोटी सामने खेळायला जाणं शक्य नाही. त्यामुळे बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी दुसरा संघ तयार केला आहे. हा संघ इंग्लंड दौऱ्याचा भाग नसणार आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच वेळी भारताचे दोन संघ खेळणार आहेत. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाच वेळी भारताचे दोन संघ खेळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २३ वर्षापूर्वी १९९८ मध्येही असंच घडलं होतं. १९९८ मध्ये राष्ट्रकुल खेळामध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. यावेळी भारतीय संघाला कॅनडामध्ये सहारा कप खेळायला जायचं होतं. त्यावेळीही बीसीसीआयने दोन क्रिकेट संघ तयार केले होते.  

राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत पाठवलेल्या संघाचे कर्णधारपद अजय जडेजाकडे देण्यात आलं होतं. या संघात सचिन तेंडुलकर, व्ही.व्ही.एस लक्ष्मण, हरभजन सिंग, रॉबीन सिंग, अनिल कुंबळे यांचा समावेश होता. तर सहारा कप स्पर्धेत मोहम्मद अझरुद्दीनच्या संघात सौरव गांगुली, नवज्योतसिंग सिद्धू, राहुल द्रविड, जवागल श्रीनाथ यांचा समावेश होता. 



हेही वाचा - 

  1. आयपीएल खेळणारे 'या' देशातील खेळाडू सुखरूप घरी पोहोचले


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा