Advertisement

वेंगसरकर संघाला विजेतेपद


वेंगसरकर संघाला विजेतेपद
SHARES

'दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन' आयोजित 'टोटल कप' या 14 वर्षांखालील खेळाडूंच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत वेंगसरकर संघाने गावस्कर संघावर 10 विकेटने मात केली. याशिवाय वेंगसरकर संघाने सर्वाधिक 9 गुणांसह स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले. ही स्पर्धा ओव्हल मैदानावर झाली.

विजेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या विदर्भ संघाचे 5 गुण झाले. त्यांनी 8 बाद 363 धावांवर डाव घोषित केला. पण तेंडुलकर संघाने आयुष जेठवाच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर पाहुण्यांना पहिल्या डावातील आघाडीसाठी चांगलेच झुंजवले. स्पर्धेत तीन शतकासह 6 बळी मिळविणाऱ्या आयुष जेठवा याची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. तर फलंदाजीत सातत्य राखणाऱ्या विदर्भ संघाच्या रोहित बिनकर याला सर्वोत्तम फलंदाज म्हणून गौरविण्यात आले. विदर्भाचाच दानिश मालेवार स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज ठरला. विजेत्यांना टोटल लुब्रिकन्टचे एम. डी. दिलीप वासवानी आणि भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

वेंगसरकर संघाने 8 बाद 165 धावा करून 67 धावांची आघाडी मिळविली होती. त्याच धावसंखेवर आपला डाव घोषित करून त्यांनी निर्णायक विजयासाठी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांचा मध्यमगती गोलंदाज प्रिन्स बदानी (23/3) आणि पहिल्या डावात पाच बळी मिळविणारा आदित्य जाधव (35/2) यांनी गावस्कर संघाला दुसऱ्या डावात केवळ 28 षटकांत 81 धावांवर गुंडाळले आणि दुसऱ्या डावात बिनबाद 16 धावा करून बोनस गुणासह ही लढत जिंकून विजेतेपदही खिशात टाकले.

कर्नाटकसोबतच्या लढतीत पाहुण्या विदर्भ संघाने 8 बाद 363 धावांवर डाव घोषित केला. तेंडुलकर संघाने विदर्भाच्या 363 धावांच्या आव्हानासमोर ६१ धावांत 5 बळी गमावले होते. मात्र आयुष जेठवा याने एका बाजूने खिंड लढवत नाबाद शतकी खेळी साकारली. त्याने 22 चेंडूंचा सामना करताना 20 चौकारांसह नाबाद 123 धावांची खेळी साकारल्याने पाहुण्या विदर्भ संघाला पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळाले नाहीत आणि ही लढत अनिर्णीत राहिली. खेळ संपला तेव्हा तेंडुलकर संघाच्या 6 बाद 181 धावा झाल्या होत्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा