Advertisement

माजी क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती स्थिर

ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची तब्येत स्थिर असल्याचं समजत आहे.

माजी क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती स्थिर
SHARES

भारताला सन १९८३ मध्ये पहिलावहिला क्रिकेट वर्ल्डकप मिळवून देणारे भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि जागतिक ख्यातीचे अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची तब्येत स्थिर असल्याचं समजत आहे. (veteran indian cricketer kapil dev suffers heart attack )

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार कपिल देव यांना मध्यरात्री १ वाजता छातीत दुखू लागल्याने ते दक्षिण दिल्लीतील ओखला परिसरात असलेल्या फोर्टिस रुग्णालयात तपासणीसाठी आले होते. डाॅक्टरांनी त्यांची तपासणी केल्यावर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत ब्लाॅकेज आढळून आल्याने त्यांच्यावर रात्रीच अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली.

शस्त्रक्रियेनंतर कपिल देव यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून डाॅक्टर त्यांच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून आहेत. तब्येतीत सुधारणा झाल्यावर त्यांना काही दिवसांत डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे.

कपिल देव यांचं करिअर

कपिल देव यांनी १३१ टेस्ट मॅचमध्ये ८ शतक आणि २७ अर्धशतकांच्या मदतीने ५२४८ रन्स बनवले आहेत. टेस्ट मॅचमध्ये त्यांचा सर्वोत्तम स्कोअर १६३ रन्स आहे. तर  त्यांनी २२५ वन डे मॅचमध्ये १ शतक आणि १४ अर्धशतकांच्या मदतीने ३७८३ रन्स केले आहेत. वन डेमध्ये त्यांचा सर्वोत्तम स्कोअर १७५ आहे. तर १३१ टेस्टमध्ये त्यांनी ४३४ विकेट्स मिळवले आहेत. शिवाय २२५ वन डे मॅचमध्ये २५३ विकेट्स काढल्या आहेत.   

क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम आॅलराऊंडर अशी ओळख असलेल्या कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने १९८३ साली पहिला वर्ल्डकप पटकावला होता. त्यावर एक बायोपिक बनत असून कपिल देव यांची भूमिका रणवीस सिंग आणि त्यांची पत्नी रोमी देवी यांची भूमिका दीपिका पदुकोण साकारत आहेत.Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement