Advertisement

IPL 2020 : विराट कोहलीला १२ लाखांचा दंड!


IPL 2020 : विराट कोहलीला १२ लाखांचा दंड!
SHARES

किंग्ज इलेव्हन पंजाबनं आपल्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. लोकेश राहुलच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर पंजाबने २० षटकात २०६ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ १७ षटकात १०९ धावांतच गारद झाला. त्यामुळे पंजाबला तब्बल ९७ धावांनी मोठा विजय मिळाला. ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा ठोकणारा लोकेश राहुल सामनावीर ठरला. परंतु, या सामन्यानंतर विराट कोहलीला १२ लाखांचा दंड झाला आहे.

विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना षटकांची गती कायम न राखल्याप्रकरणी आरसीबी संघाचा कर्णधार विराट कोहलीला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या नियामानुसार आरसीबीच्या संघाची ही पहिली चूक होती. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीला १२ लाख रुपयांच दंड करण्यात आला.

कर्णधार के. एल. राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर पंजाबने तब्बल ९७ धावांनी मोठा विजय मिळाला. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने राहुलचा ८३ आणि ८९ या धावसंख्येवर असताना २ वेळा सीमारेषेजवळ झेल सोडला. त्यानंतर राहुलने तुफान फटकेबाजी करत पुढील १० चेंडूत ४३ धावा कुटल्या. ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा ठोकणारा लोकेश राहुल सामनावीर ठरला.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement