Advertisement

world test championship final : भारत-न्यूझीलंड सामना आजपासून

सलामीला रोहित शर्माच्या साथीला शुभमन गिल उतरेल. तर चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे या फलंदाजांवर भारताच्या मधल्या फळीची प्रमुख मदार असेल.

world test championship final : भारत-न्यूझीलंड सामना आजपासून
SHARES

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील (world test championship final) अंतिम सामना आज शुक्रवारी भारत (india) आणि न्यूझीलंड (new zealand) यांच्यात होत आहे. ही लढत इंग्लंडमध्ये होत आहे. केन विल्यमसन (Ken Williamson) च्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडचे आव्हान परतवून लावण्यासाठी विराट कोहली (virat kohli) च्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सज्ज झाला आहे. 

सलामीला रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या साथीला शुभमन गिल (Shubhaman Gill) उतरेल. तर चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे या फलंदाजांवर भारताच्या मधल्या फळीची प्रमुख मदार असेल. इशांत शर्मा, जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी या तीन वेगवान गोलंदाजांसह खेळपट्टीचे स्वरूप पाहता अश्विन आणि जडेजा या दोन फिरकी गोलंदाजांचा संघात समावेश करण्यात आला आहे

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आयसीसीने प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केली आहे आणि त्यामुळे या पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद कोण पटकावणार याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे. आयसीसीने जून २०१९ मध्ये ही स्पर्धा सुरू केली आणि कसोटी खेळणाऱ्या ९ देशांमध्ये अंतिम फेरीसाठीची शर्यत रंगली. 

भारत आणि न्यूझीलंड या संघांनी फायनलसाठीच्या शर्यतीत अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान पटकावले. कोरोना संकटामुळे काही सामने रद्द करावे लागल्याने आयसीसीने स्पर्धेच्या मध्यंतरानंतर नियमांतही किंचीत बदल केले. विश्वविजेत्या संघाला १६ लाख डॉलरचे इनाम मिळणार आहे.

१८ ते २२ जून या कालावधीत साऊदॅम्प्टन येथील रोस बाऊल स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता हा सामना सुरू होईल. स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी एचडी येथे सामना पाहता येईल. हॉटस्टारवरही हा सामना पाहता येईल.

भारताचा संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्घीमान सहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव व मोहम्मद सिराज

न्यूझीलंडचा संघ

केन विलियम्सन (कर्णधार), टॉम ब्लंडल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवेय, कॉलीन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नेल वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग



हेही वाचा - 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा

राहुल द्रविड बनले भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा