Advertisement

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना १८ ते २२ जून दरम्यान इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा
SHARES

न्यूझीलंड (new zealand) विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी (world test championship final) १५ सदस्यीय भारतीय संघाची (team india) घोषणा करण्यात आली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना १८ ते २२ जून दरम्यान इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. 

या सामन्यासाठी टीम इंडियाचे कर्णधारपद विराट कोहली (virat kohli) कडे, तर उपकर्णधारपद अजिंक्य रहाणेकडं सोपवण्यात आलं आहे. भारताच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे दोघे करणार आहेत. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर चेतेश्वरर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे हे मातब्बर फलंदाज असतील. या संघात हनुमा विहारी आणि मोहम्मद सिराजचाही समावेश आहे. तर केएल राहुल, मयांक अग्रवाल, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांना वगळण्यात आलं आहे.  

यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांना स्थान मिळालं आहे. रवींद्र जडेजा आणि आर अश्विनला संघात जागा मिळाली आहे. संघात पाच वेगवान गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि इशांत शर्मा यांचा समावेश करण्यात आला आहे. 

जलदगती गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादवला या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. न्यूझीलंडने या सामन्यासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असलेल्या २० लोकांच्या संघातून पाच खेळाडूंना वगळण्यात आलं आहे.

भारतीय संघ 

रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान सहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड संघ 

केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेवोन कॉन्वे,कॉलिन डी ग्रॅन्डहोमे, मॅट हेनरी, काइल जेमिसन, टॉम लाथम, हेनरी निकोलस, एजाज पटेल, टीम साउदी, रॉस टेलर, नील वॅग्नर, बीजे वॉटलिंग, विल यंग.



हेही वाचा -

राहुल द्रविड बनले भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक

All Format Cricket संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडं



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा