Advertisement

अॅडव्होकेट टुर्नामेंटमध्ये चौधरी संघाची वारूंजीकर संघावर मात


अॅडव्होकेट टुर्नामेंटमध्ये चौधरी संघाची वारूंजीकर संघावर मात
SHARES

अॅडव्होकेट विजय तुळपुळे चषक क्रिकेट टुर्नामेंट स्पर्धेमध्ये गुरुवारी झालेल्या अंतिम सामन्यामध्ये यदुनाथ चौधरी संघाने 19 धावांच्या फरकाने उद्य वारूंजीकर संघावर मात केली. अॅडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

ओव्हल मैदानावर खेळवण्यात आलेला हा सामना मोठा अटीतटीचा झाला. पहिल्या डावात चौधरी संघाने 154 धावांचा डोंगर रचून प्रतिस्पर्धी वारूंजीकर संघासमोर कडवे आव्हान ठेवले.



उत्तरादाखल मैदानात उतरलेल्या वारूंजीकर संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत चौधरी संघाला दबावाखाली आणलं. मात्र, रेडेकर, ओमनील जाधव आणि दिगंबर पवार या बॉलर्सनी केलेल्या तीखट माऱ्यापुढे वारूंजीकर संघाने लोटांगण घातले. रेडेकर आणि जाधव यांनी प्रत्येकी 3 विकेट तर पवारने 2 विकेट घेत चौधरी संघाला 135 धावांवर रोखण्यात मोलाची कामगिरी बजावली.

अॅडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियातर्फे आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये एकूण 8 संघांनी सहभाग घेतला होता. हे सर्व संघ उच्च न्यायालयातील होते. या स्पर्धेतला प्रत्येक खेळाडू हा वकील होता. स्पर्धेचे उद्घाटन न्यायाधीश सारंग कोतवाल यांच्या हस्ते करण्यात आले.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा