घाटकोपरमध्ये १ हजार शर्टांची चोरी


घाटकोपरमध्ये १ हजार शर्टांची चोरी
SHARES

घाटकोपर परिसरातीस एका कपड्याच्या दुकानातून १ हजार शर्टांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ४ अज्ञात चोरांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला असून दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.


कशी झाली चोरी?

घाटकोपर पूर्वेकडील नायडू कॉलनीमध्ये विनय भानुशाली (२१) यांचं कपड्याचं दुकान आहे. काही दिवसांपूर्वी विनय एकटेच दुकानात असताना अचानक चौघेजण दुकानात घुसले आणि त्यांनी भानुशाली यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. 


सीसीटीव्हीत आरोपी कैद

भानुशाली यांना दुकानात कोंडून त्यांचे हात पाय बांधून त्यांना लाथा बुक्याने मारहाण करण्यात आली. त्यानंतर भानुशाली यांना खुर्चीवर बांधून दुकानातील १ हजार शर्ट घेऊन आरोपी तिथून पसार झाले.

कॅरॅडॉन ब्रॅण्डच्या या शर्टची किंमत ४ लाखांच्या घरात आहे.  या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.



हेही वाचा-

शाळकरी मुलांना भरधाव टेम्पोने उडवलं, एकीचा मृत्यू तिघे जखमी

'अशा' गेमपासून सावध रहा!, नाहीतर असं तुमच्यासोबतही घडू शकतं


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा