मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून वेश्यावृत्तीत ढकलणारा नराधम गजाआड


मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून वेश्यावृत्तीत ढकलणारा नराधम गजाआड
SHARES

16 वर्षाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याशी लग्न करून तिला वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या नराधमाला त्याच्या पापांची शिक्षा मिळाली आहे. मुंबईच्या विशेष सत्र न्यायालयाने मोहम्मद जावेद आलम सुन्नी (24) याला दोषी ठरवत 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.


काय आहे हा संपूर्ण प्रकार?

2014 साली मोहम्मद सुन्नीने 16 वर्षाच्या मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अोढलं, तिला लग्नाचं स्वप्न दाखवून आपलं घर सोडण्यास भाग पाडलं आणि तीला घेऊन तो कल्याणच्या अंबिवली येथे गेला. तिथे त्याने या मुलीवर जबरदस्ती केली. पण एकमहिन्यानंतर या मोहम्मद जावेद आलम सुन्नीचं खंर रुप समोर आलं.

29 अॅगस्ट 2014 रोजी मोहम्मद जावेद मुलीला घेऊन पुन्हा मुंबईला आला. मात्र यावेळी संसार करण्याच्या बहाण्याने नाही, तर चक्क मुलीची विक्री करण्याठी तो आला होता. सुदैवाने ज्या महिलेकडे मोहम्मद जावेद मुलीला विकणार होता ती देखील अगदी अशाच प्रकारे या वैश्यावृत्तीच्या कचाट्यात अडकली होती. त्या मुलीकडे बघताच तिला आपली कहाणी आठवली आणि तीने या नराधमाला अद्दल घडवण्याचं ठरवत या मोहम्मदला पोलिसांच्या हवाली केलं.


आरोपीला अटक

डी. बी मार्ग पोलिसांनी मोहम्मद जावेदला पॅाक्सो आणि मुलीला वैश्याव्यवसायत ढकलण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली.
या प्रकरणाचा पोलीस निरीक्षक पंढरीनाथ पाटील, तपास अधिकारी बासितअली सय्यद यांनी योग्य प्रकारे तपास करून पोलीस अधिकारी प्रियंका शेलवडे, पैरवी अधिकारी कदम, नलावडे आणि पथकाने पाठपुरावा केल्याने आज निकाल आमच्या बाजूने लागल्याची प्रतिक्रीया डी. बी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडुरंग शिंदे यांनी मुंबई लाईव्हशी बोलताना दिली.


आरोपीला 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

या प्रकरणी विशेष सत्र न्यायाधीश रेखा एन. पंधारे यांनी मोहम्मद जावेद आलम सुन्नीला दोषी ठरवत कलम 372 अन्वये 7 वर्षे आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या कलम 6 अन्वये 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. मुलीला 25 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचं देखील कोर्टानं आपल्या आदेशात म्हटलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा