13 बाईक, 2 कार आगीत जळाल्या

  Mumbai
  13 बाईक, 2 कार आगीत जळाल्या
  मुंबई  -  

  भांडुप- येथील श्रीरामपाडा परिसरात रविवारी मध्यरात्री वाहनांची जाळपोळ करण्यात आली. यात 13 मोटारसायकल आणि 2 कार जळून खाक झाल्यात. येथील रहिवासी रस्त्याच्या बाजूला आपली वाहने पार्क करत असतात. काल रात्री दोन वाजता अचानक या गाड्यांना समाजकंटकांनी आग लावली. 

  ही आग लागल्याचे स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी अग्निशमन दलाला कळवले. तोपर्यंत स्थानिकांनी आपल्या घरातून पाणी आणून ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाची एक गाडी आल्यावर ही आग आटोक्यात आली. पुढील तपास भांडुप पोलीस करीत आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.