कांदिवलीत नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या


कांदिवलीत नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
SHARES

कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये एका नववीच्या विद्यार्थिनीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. हर्षिका धिरेंद्र मायावंशी (१४) असं या मुलीचं नाव आहे. तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजलेलं नसून समता नगर पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.


कधी घडली घटना?

हर्षिका धिरेंद्र ही कांदिवली पूर्वेकडील ठाकूर कॉम्प्लेक्समधील गारडेनिया अपार्टमेंटमध्ये आपल्या कुटुंबासोबत रहात होती. गुरुवारी संध्याकाळी हर्षिका ही घराशेजारील आर्केड इमारतीच्या आठव्या मजल्यावर चढली. या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. दरम्यान ती खाली उडी मारण्याच्या तयारीत असताना, समोरच्या इमारतीतल्या रहिवाशांनी ते पाहिलं आणि तिला उडी मारण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्नही केला. मात्र तिने उडी मारून आत्महत्या केली.

हर्षिकाला तात्काळ उपचारासाठी जवळच्या श्री साई रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.



हेही वाचा-

लोकलमध्ये सापडली ५ दिवसांची चिमुरडी

छगन भुजबळांना विशेष पीएमएलए कोर्टाचा दिलासा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा