क्वारंनटाइनमधून पळालेल्यांची धरपकड सुरू


क्वारंनटाइनमधून पळालेल्यांची धरपकड सुरू
SHARES
महाराष्ट्रात या संसर्ग रोगाने  जण बाधित झालेल्या रुग्णांचा आकडा 85वर पोहचला आहे. अनेकांना तपासून 'होम क्वारंटाइन' राहण्यास सांगितले असताना, अनेक जण सरकारी आदेश पायदळी तुडवक बिनदिक्कत बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास आले. या तरुणांवर निर्बंध आणण्यासाठी मुंबई पोलिसांनी आता प्रत्येक पोलिस ठाण्यात एका विशेष पथकाची निर्मिती करत क्वारंनाइनमधून पळ काढणाऱ्या 15 जणांची आतापर्यंत धरपकड केली आहे. शनिवारी कुर्ला येथे आरपीएफ पोलिसांनी 9 कोरोनाची चाचणी करून आलेल्यांना 'होम क्वारंटाइन' करण्यास सांगितले.  माञ हे 9 जण आज कुर्ला टर्मिनलहून प्रयागराजपूर एक्सप्रेसने गावी जाण्यासाठी निघाले. माञ वेळीच ही बाब सह प्रवाशाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरपीएफ पोलिसांना कळवले. काही दिवसांपूर्वी पालघर रेल्वेने क्वारनटाइन करण्यात आलेले 5 जण प्रवास करताना आढळले होते. तर धारावीतून एका संशयिताला ताब्यात घेत पोलिसांनी क्वारनटाइन केले आहे. 


भारतात 200हून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. संपर्कातून पसरणाऱ्या या व्हायरसचा संसर्ग थांबवण्यासाठी प्रशासनाने भारतातील अनेक शहरांमध्ये मॉल, सिनेमागृह आणि गर्दीचा ठिकाणी बंदे ठेवण्यात आली आहेत. नरेंद्र मोदी यांनी भारतातील जनतेला उद्या म्हणजे 22 मार्च रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. तसेच करोनाची चाचणी पॉझिटीव्ह आलेलेल्या अनेकांना 'होम क्वारंटाइन' करण्यात आले. मात्र असे करुनही काही जण फरार होत असल्याच्या गंभीर घटना समोर येत आहेत. मुंबईत देखील अशाच घटना समोर येत आहेेत.


 या घटना रोखण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांनी कोरोनाची चाचणी करून ज्या रुग्णांना 'होम क्वारंटाइन'चे आदेश दिले आहेत. अशा रुग्णांच्या घरी अनिश्चित भेट देऊन रुग्ण घरी आहे की नाही हे तपासणार आहेत. या पथकात दोन पोलिस उपनिरीक्षक आणि चार काँन्स्टेबलचा समावेश असणार आहे. चार दिवसांपूर्वी एक व्यक्ती दुबईहून भारतात परतली होती. भारतात त्याची करोनाची चाचणी घेण्यात आली होती. चाचणी पॉझिटीव्ह येताच त्याला 'होम क्वारंटाइन' करण्यात आले होते. पण या व्यक्तीने सर्व आदेश तोडले आहेत. या व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाला असूनही तो धारावीच्या रस्त्यांवर फिरत होता. पण मुंबई पोलिसांना याबाबत समज देत, त्याला पकडून सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान शनिवारी कुर्ला येथे आरपीएफ पोलिसांनी 9 कोरोनाची चाचणी करून आलेल्यांना 'होम क्वारंटाइन' करण्यास सांगितले.  माञ हे 9 जण आज कुर्ला टर्मिनलहून प्रयागराजपूर एक्सप्रेसने गावी जाण्यासाठी निघाले. माञ वेळीच ही बाब सह प्रवाशाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरपीएफ पोलिसांना कळवले. तर काही दिवसांपूर्वी पालघर रेल्वेने क्वारनटाइन करण्यात आलेले 5 जण प्रवास करताना आढळले होते. तर धारावीतून एका संशयिताला ताब्यात घेत पोलिसांनी क्वारनटाइन केले आहे. त्यामुळे अशा बेफिकीर रुग्णावर आता पोलिस पाळत ठेवून राहणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा