कांदिवलीत १४ व्या मजल्यावरून मुलाने मारली उडी


कांदिवलीत १४ व्या मजल्यावरून मुलाने मारली उडी
SHARES

इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून उडी घेतल्याने एका १५ वर्षांच्या मुलाचा मत्यू झाल्याची घटना कांदिवलीत उघडकीस आली. कांदिवलीतील त्या इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याला १४ मजल्याच्या गॅलरीत बसल्याचं पाहिलं. त्यावेळी त्यांनी सुरक्षा रक्षकालाही सांगितलं. मात्र सुरक्षा रक्षक तिथं पोहोचेपर्यंत त्याने उडी घेतली होती.


मुलाने का केली आत्महत्या?

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवलीत राहणारा हा मुलगा ९ च्या वर्गात शिकत होता. तो अभ्यासातही चांगलाच हुशार होता. तो चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाला होता. तो अंधेरीतील फुटबॉल अॅकॅडमी इथं फुटबॉलचं प्रशिक्षण घेत होता. त्याचे आई-वडील कामाच्या निमित्ताने परदेशात राहतात. त्यामुळे तो त्याची बहीण आणि आजोबा यांच्यासोबत राहात होता. त्या मुलाने इंस्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटोंसह एक पत्र लिहलं होतं.

ज्या ठिकाणी त्याने उडी घेतली तेथे हेडफोन आणि पोर्टेबल स्पीकर आढळून आलं. त्याच्या मित्राने सांगितलं की, तो सोमवारपर्यंत कोणत्याही तणावाखाली नव्हता. सध्या पोलिसांनी याप्रकरणाची नोंद घेतली असून तपास सुरू केला आहे.



हेही वाचा-

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीला दुबईत अटक

ड्रोन टिपणार मुंबईकरांच्या हालचाली


 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा