कराटे बेल्टने गळा आवळून आईची हत्या

४१ वर्षाच्या महिलेला आपल्या मुलीने डॉक्टर व्हावे, अशी इच्छा होती. त्यासाठी तिला आतापासून ‘नीट’ परिक्षेची तयारी करावी यासाठी ती मुलीच्या मागे अभ्यासाचा तगादा लावत होती. त्यावरुन दोघींमध्ये अनेकदा भांडणे होत

कराटे बेल्टने गळा आवळून आईची हत्या
SHARES

कराटे बेल्टने गळा आवळून आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबई समोर आली आहे. विशेष म्हणजे ही मुलगी अवघ्या १५ वर्षाची आहे. आईने अभ्यासाचा तगादा लावल्याने राग अनावरण होऊन मुलीने आईची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

नवी मुंबईतील ऐरोलीत ३० जुलै रोजी ही घटना घडली. ४१ वर्षाच्या महिलेला आपल्या मुलीने डॉक्टर व्हावे, अशी इच्छा होती. त्यासाठी तिला आतापासून ‘नीट’ परिक्षेची तयारी करावी यासाठी ती मुलीच्या मागे अभ्यासाचा तगादा लावत होती. त्यावरुन दोघींमध्ये अनेकदा भांडणे होत. या घटनेच्या अगोदर या मुलीने आपल्या आईविषयी पोलिसांकडे तक्रारही केली होती. पोलिसांनी तिच्या पालकांना समुदेशनासाठी बोलावले होते.

३० जुलैला परीक्षेच्या तयावरीवरुन दोघींमध्ये पुन्हा एकदा भांडण झालं. यानंतर मुलीने कराटे बेल्टने गळा आवळून आईची हत्या केली. मुलीने आईचा मृतदेह बेडवर ठेवला आणि आत्महत्या दर्शवण्यासाठी आईच्या मोबाइलवरुन मामाला मेसेज पाठवला. मी सर्व प्रयत्न केले, पण आता माघार घेते असं तिने मेसेजमध्ये लिहिलं होतं, अशी माहिती रबाळे पोलिसांनी दिली आहे.

शवविच्छेदन केलं असता गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचं उघड झालं. महिला पोलीस कर्मचाऱ्याने मुलीला विश्वासात घेतलं असता तिने हत्येची कबुली दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा