क्षुल्लक वादातून 15 वर्षीय तरुणीची हत्या

गोरेगाव - गोरेगावमध्ये राहणाऱ्या मेघना अगवने हिची हत्या करण्यात आली आहे. शेजाऱ्यांशी झालेल्या किरकोळ भांडणातून या तरुणीची हत्या करण्यात आली. गोरेगावमध्ये ही घटना घडली. सोमवारी मेघना क्लासवरुन घरी परतत होती. त्यावेळी तिला एका शेजाऱ्याने दुसऱ्या रस्त्यावरुन जायला सांगितलं. या गोष्टीवरुन झालेल्या भांडणात मेघनाच्या पायावर बाटली मारण्यात आली. त्यात तिला जखमा झाल्या होत्या. 

याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. पण, पोलिसांनी याबाबतीत काहीच लक्ष दिलं नसल्याचं कुटुंबियांनी सांगितलं. संध्याकाळी मेघना आणि पूजा या दोन्ही बहिणी याबाबत जाब विचारायला गेले असता शेजाऱ्यांनी त्या दोघींना बेदम मारहाण केली. हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मेघनाला सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथं तिला मृत घोषित करण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या 6 जणांना अटक केली आहे.

Loading Comments