नऊ महिने उलटले तरी अनिकेत बेपत्ताच!


नऊ महिने उलटले तरी अनिकेत बेपत्ताच!
SHARES

मुलुंडमध्ये एक 16 वर्षांचा मुलगा गेल्या 9 महिन्यांपासून बेपत्ता आहे.  पण पोलिसांना या मुलाचा शोध लावण्यात अजूनही यश आलेले नाही.


मुलगा अचानक झाला बेपत्ता

मुलुंड पश्चिमेकडील इशछाया सोसायटीत राहणारा आणि इयत्ता नववीच्या वर्गात शिकणारा अनिकेत तिवारी हा तब्बल नऊ महिने उलटले तरी अजूनही बेपत्ताच आहे. १५ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झालेल्या अनिकेतचा मुलुंड पोलिसांना कोणताच ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही.

१५ फेब्रुवारी रोजी दुपारी घराच्या शेजारील उद्यानात अनिकेत खेळत होता. परंतु त्यानंतर तो कुठे गेला? हे कोणालाच माहीत नाही.
अनिकेत हा नियमित क्लासला देखील जात नव्हता तसेच त्याचे अभ्यासात देखील लक्ष नव्हते. म्हणून अनिकेतचे वडील अनिकेतवर रागावले होते. त्या रागाच्या भरात अनिकेत घर सोडून गेल्याचा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत. परंतु तो कुठे गेलाय हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.


पोलीस तपास सुरूच

अनिकेत इंटरनेट किंवा मोबाईल वापरत नाही. त्याचे मित्र किंवा नातेवाईकांशी यासंदर्भात चर्चा करूनही कोणताच धागादोरा हाती लागत नाही. असे असले तरी तपास मात्र सुरूच असल्याचे पोलीस उपनिरीक्षक विक्रांत पाटील यांनी सांगितले. अनिकेत संदर्भात कोणतीही माहिती असल्यास ताबडतोब मुलुंड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन अनिकेतचे वडील राजेंद्र तिवारी यांनी केले आहे.


हेही वाचा - 

मुलीचे अपहरण करणारी 'ती' महिला गजाआड


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा