१९९३ च्या बाॅम्बस्फोटातील 'या' मुख्य आरोपीचा नाशिक तुरुंगात मृत्यू

युसुफ मेमन १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी होता, याला न्यायालयाने २००७ मध्ये दोषी ठरवले होते

१९९३ च्या बाॅम्बस्फोटातील 'या' मुख्य आरोपीचा नाशिक तुरुंगात मृत्यू
SHARES

अंडरवर्ल्ड डॉन टायगर मेमनचा भाऊ युसूफ मेमन यांचे शुक्रवारी महाराष्ट्रातील नाशिक तुरूंगात निधन झाले. हार्ट अँटकने त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्याच्या मृत्यूचे ठोस कारण अद्याप समजू शकले नाही.  युसुफ मेमन १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी होता, याला न्यायालयाने २००७ मध्ये दोषी ठरवले होते. प्रथम तो मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये बंद होता, परंतु २०१८ मध्ये त्याला नाशिक तुरूंगात हलविण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार शुक्रवारी सकाळी १०.३० वा. युसूफ मेमनच्या छातीत दुखू लागले. त्याची प्रकृती अचानक प्रकृती बिघडली. जेल प्रशासनांकडून त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवणार तोच  त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे कारण प्राथमिक तपासणीत हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ठ होईल. त्याचा दुसरा भाऊ इसाक मेमन हा देखील नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. हे दोघेही २०१८पासून या कारागृहात शिक्षा भोगत आहे. बॉम्बस्फोटाचा कट रचण्यासाठी आपला फ्लॅट दिल्याचा या दोघांवरही आरोप होता.

मुंबईत झालेल्या १९९३ च्या बॉम्बस्फोटातला युसुफ हा महत्वाचा आरोपी होता. या स्फोटात मुंबईतील ३१७ जणांचा मृत्यू झाला होता. १४०० हून जास्त नागरिक गंभीर जखमी झाले होते. तर  शेकडो लोकांना कायमचे अंपगत्व आले.  हा स्फोट घडवण्यात कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि युसुफचा भाऊ टायगर मेमन याचा सर्वात मोठा हात होता. बॉम्बस्फोटानंतर दाऊद आणि टायगर हे देश सोडून पळून गेले. या स्फोटात मेमन कुटुंबातील चार लोकांचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यापैकी याकुब मेमनला नागपूर तुरूंगात यापूर्वीच फाशी देण्यात आली आहे, तर युसूफला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर टायगर आणि अयूब मेमन अद्याप पोलिसांच्या कस्टडीत आहेत.

१९९३ बाँम्बस्फोट प्रकरणी मुंबई पोलिसांनी ४ नोव्हेंबर १९९४ रोजी १० हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं. या प्रकरणात ६०० लोकांची साक्ष घेण्यात आली होती. तर अभिनेता संजय दत्त सह ११७ जणांना अटक करण्यात आली होती.  २२ वर्ष टाडा कोर्टात या प्रकरणी सुनावणी चालली. याप्रकरणी २००६ मध्ये कोर्टाने याकूब मेमन याला ही दोषी ठरवलं होतं. तर २३ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. याप्रकरणात आतापर्यंत १४ दोषींना फाशी ठोठावण्यात आली आहे. यात २०१५मध्ये याकूब मेमनला फाशी दिली गेली आहे. तर अबू सालेमसह २२ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 


१९९३ साली या ठिकाणी स्फोट झाले होते. 

(१) मुंबई स्टॉक एक्सचेंज

(२) नरसी नाथ रस्ता

(३) शिवसेना भवन

(४) एअर इंडिया बिल्डिंग

(५) शतक बाजार

(६) माहीम

(७) झवेरी बाजार

(८) सी रॉक हॉटेल

(९) प्लाझा सिनेमा

(१०) जुहू सेंटौर हॉटेल

(११) सहार विमानतळ

(१२) विमानतळ सेंटौर हॉटेल

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा