रागातून तरूणावर चाकूहल्ला, दोघांना अटक

रस्त्यांवरील मुलींना छेडताना हटकल्याच्या रागातून एका व्यक्तीवर चाकू हल्ला करणाऱ्या दोघा जणांना कुर्ला पोलिसांनी अटक केली आहे. जिशान अली (२५) आणि सलमान खुर्शीद (२०) अशी या आरोपींची नावे आहेत.

रागातून तरूणावर चाकूहल्ला, दोघांना अटक
SHARES

रस्त्यांवरील मुलींना छेडताना हटकल्याच्या रागातून एका व्यक्तीवर चाकू हल्ला करणाऱ्या दोघा जणांना कुर्ला पोलिसांनी अटक केली आहे. जिशान अली (२५) आणि सलमान खुर्शीद (२०) अशी या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दोघांवर मारहाणीचा गुन्हा नोंदवला असून ज्या मुलीची हे दोघे छेड काढत होते, तिच्याकडून तक्रार नोंदवल्यावर दोघांवर विनयभंगाचा गुन्हा पोलिस नोंदवण्याची शक्यता आहे.


नेमका प्रकार काय?

कुर्ल्यातील पाइपलाइन रोडवर जिशान आणि सलमान हे दोघेजण रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेड काढत होते. जवळच साजिद अन्सारी हा तरूण या दोघांच्या हरकतीवर नजर ठेवून होता. त्याचवेळेस रस्त्यावरून दोन अनोळखी मुली जात असताना या दोघांनी त्यांची छेड काढली.


वचपा काढला

हा प्रकार होताच अन्सारीने या दोघांना हटकलं. तिघांमध्ये बाचाबाची होताच रस्त्यावर उपस्थित रहिवाशांनी त्यांना पकडून मारहाण केली. या गोष्टीचा राग मनात धरून जिशाद आणि सलमान यांनी काही तासांनी अन्सारी यांना गाठून त्यांच्यावर चाकूने वार केले.


गुन्हा दाखल

या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी दोघांवर गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली. तसंच हे दोघे ज्या मुलींची छेड काढत होते. त्या मुलींचा शोध सुरू असून त्यांची ओळख पटलून तिच्या तक्रारीनुसार आरोपींवर विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात येईल, अशी माहिती कुर्ला पोलिसांनी दिली.



हेही वाचा-

मुलाच्या मृतदेहासाठी कुटुंबाकडे २ लाखांची मागणी, चेंबुरचा धक्कादायक प्रकार

नशेचा नवा अंमल 'डुकूका', मुंबई विमानतळावर ८ जणांना अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा