नशेचा नवा अंमल 'डुकूका', मुंबई विमानतळावर ८ जणांना अटक

भारतात या अंमली पदार्थावर अद्याप बंदी नसल्याने हे परदेशी नागरिक 'डुकूका' हा अंमली पदार्थ विकण्यासाठी मुंबईत आल्याचं तपासात पुढे आलं आहे. या प्रकरणी सहार पोलिसांनी ८ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्याकडे २५० किलो वजनाचा 'डुकूका' पोलिसांना सापडला आहे.

नशेचा नवा अंमल 'डुकूका', मुंबई विमानतळावर ८ जणांना अटक
SHARES

मुंबई पोलिस अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांविरोधातील फास जसजसा आवळू लागलेत, तसतसे तस्कर नवीन अंमली पदार्थ बाजारात आणून तरूणांभोवतीचा नशेचा विळखा घट्ट करू पाहताहेत. असाच एक नवीन अंमली पदार्थ पोलिसांच्या हाती लागला असून या पदार्थाचं नाव आहे 'डुकूका'. मुंबईत 'डुकूका'ची अत्यंत वेगाने तस्करी सुरू झाली आहे. या प्रकरणी सहार पोलिसांनी गुरूवारी ८ परदेशी नागरिकांना अटक केली आहे.

भारतात बंदी नाही

भारतात या अंमली पदार्थावर अद्याप बंदी नसल्याने या परदेशी नागरिकांनी 'डुकूका' हा अंमली पदार्थ विकण्यासाठी मुंबईत आणल्याचं तपासात पुढे आलं आहे. या प्रकरणी सहार पोलिसांनी ८ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्याकडे एकूण २५० किलो वजनाचा 'डुकूका' पोलिसांना सापडला आहे.
कुठे केली अटक?

मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना या ८ परदेशी नागरिकांची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांनी या आठही जणांना चौकशीसाठी केबिनमध्ये नेलं. या आठही जणांच्या समानाची तपासणी केल्यावर त्यांच्याकडे 'डुकूका' हा अंमली पदार्थ आढळून आला. 

फक्त झाडाझडती

त्यांच्या चौकशीत या पदार्थाला मुंबईत बंदी नसल्याने 'डुकूका'ची सध्या तस्करांकडून मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. कारण हा पदार्थ घेऊन येणाऱ्या व्यक्तीला केवळ झडती घेऊन सोडण्यात येत असल्याने तस्कर निर्धास्तपणे 'डुकूका'च्या तस्करीला प्राधान्य देत असल्याचं त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं.

त्यानंतर अधिकाऱ्यांनी या ८ जणांना सहार पोलिसांच्या हवाली केलं. सहार पोलिसांनी या आठही आरोपींवर गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली आहे.हेही वाचा-

७ लाखांचा विनापरवाना कफ सिरप जप्त!Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा