७ लाखांचा विनापरवाना कफ सिरप जप्त!


७ लाखांचा विनापरवाना कफ सिरप जप्त!
SHARES

विनापरवाना खोकल्याच्या औषधां (कफ सिरप)ची तस्करी करणाऱ्या दोन तस्करांना मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने अटक केली. या तस्करांकडून पोलिसांनी तब्बल ३५६० बाटल्या हस्तगत केल्या असून त्यांची किंमत ७ लाख रुपये असल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी दिली.


सापळा रचला

शहरात विविध मार्गाने नशेसाठी खोकल्यांच्या औषधांची तस्करी सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या तस्करांचा माग काढायचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी दोन टेम्पोतून औषधांची तस्करी होणार असल्याची माहिती घाटकोपर युनिटच्या पोलिस निरीक्षक शेळके यांना मिळाली.


१७ लाखांची औषधे जप्त

या माहितीप्रमाणे पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घोडपदेव आणि भायखळा परिसरात सापळा रचला. त्यानुसार पोलिसांनी हजिरत रेहमत अली खान (२१) या टेम्पो चालकाला अटक केली. त्याच्या टेम्पोतून पोलिसांनी १७६० कोरेक्सच्या बाटल्या हस्तगत केल्या. या औषधांची बाजारातील किंमत ३ लाख ५० हजार रुपये इतकी आहे.

तर, भायखळा इथून मोहम्मद सिद्धिकी गुलाम हजरत खान (४५) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या टेम्पोतून पोलिसांनी १८०० बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. या औषधांची किंमत ३ लाख ६० हजार रुपये इतकी आहे. त्यानुसार पोलिसांनी एकूण ७ लाख १२ हजार रुपयांची औषधं ताब्यात घेतली असून या पोलिस मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत.


एमडी ड्रग्जसह दोघांना अटक

त्याचप्रमाणे, काॅलेज तरुणांना एमडी ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. दानिश आसिफ सैय्यद (२३), काशी गुप्ता (२१) अशी या आरोपींची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी १०९ ग्रॅम एमडी हस्तगत केलं असून त्याची किंमत २ लाख इतकी आहे. यातील काशी दहिसरचा राहणारा असून दानिश कांदिवलीचा रहिवासी आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.



हेही वाचा-

कफ सिरपची जाहिरात 'तुम्हारी सुलू' ला महागात? एफडीए बजावणार नोटीस



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा