घाटकोपरमध्ये नाल्यात सापडले मृत अर्भक

 Ghatkopar
घाटकोपरमध्ये नाल्यात सापडले मृत अर्भक
Ghatkopar, Mumbai  -  

घाटकोपर (प.) येथील कामा लेन येथे असलेल्या मोठ्या नाल्यात एक पुरुष जातीचे अवघ्या दोन दिवसांचं मृत अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.


घटनेची पोलिसांत नोंद

सोमवारी संध्याकाळी सहा वाजेदरम्यान शाळेतील काही विद्यार्थिनी इथे खेळत होत्या. त्यावेळी त्यांना हे अर्भक दिसल्यावर त्यांनी आरोळी ठोकली. मुलींचा आरडाओरडा ऐकून तिथे जमलेल्या स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी घाटकोपर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दाखल झाले. याचसोबत अग्निशमन दलाच्या मदतीने हे अर्भक बाहेर काढून शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यापूर्वी या ठिकाणीही सापडले होते अर्भक

या आधीही कांजूर मार्ग येथील एका सार्वजनिक शौचालयात आणि त्यानंतर नाहूर रेल्वे स्थानकाबाहेर अर्भक सापडले होते. त्यामुळे पुन्हा एकदा अर्भक सापडल्याने या प्रवृत्तीला आळा कधी आणि कसा बसणार ही चिंतेची बाब ठरत आहे.
हेही वाचा - 

पुन्हा एकदा सापडले बेवारस अर्भक !Loading Comments