पुन्हा एकदा सापडले बेवारस अर्भक !

Bhandup
पुन्हा एकदा सापडले बेवारस अर्भक !
पुन्हा एकदा सापडले बेवारस अर्भक !
See all
मुंबई  -  

काही दिवसांपूर्वी कांजूरमार्ग येथे एक अर्भक शौचकुपात फेकून अज्ञात व्यक्तीने पळ काढला होता. ही घटना ताजी असतानाच आता नाहूर रेल्वे स्थानकाजवळ तीन दिवसांचे पुरुष जातीचे अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे.

बुधवारी संदेश शिंदे या व्यक्तीने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून नाहूर स्थानकाजवळ एका भिंतीच्या खाली एक अर्भक बेवारस अवस्थेत सापडले असून आपण त्याला सावित्रीबाई रुग्णालयात दाखल केले असल्याचे सांगितले. भांडुप पोलिसांनी त्वरित घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर रुग्णालयात जाऊन अर्भकाची पाहणी केली. अर्भकाची प्रकृती चांगली असून तिथेच त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या अर्भकाला बाल कल्याण मंडळाकडून परवानगी घेऊन बाल संगोपन संस्थेकडे सोपवण्यात येणार आहेत. या घटनेत भांडुप पोलिसांनी अज्ञात मातेविरोधात कलम 315 आणि 317 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या मातेचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीनिवास पन्हाळे यांनी दिली आहे.हेही वाचा -

चेंबूरमध्ये आढळले मृत अर्भक

अर्भक मृत्यूचा प्रश्न गंभीर


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.