चेंबूरमध्ये आढळले मृत अर्भक

 Chembur
चेंबूरमध्ये आढळले मृत अर्भक

वाशीनाका - चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील राहुलनगर येथे गुरुवारी पहाटे पोलिसांना एक मृत अर्भक आढळून आले. अज्ञात इसमानं एका कपड्यामध्ये गुंडाळून हे मृत अर्भक एका कचराकुंडीत टाकले होते. एका रहिवाशाला हे अर्भक दिसल्यानंतर त्यानं ही बाब आरसीएफ पोलिसांना सांगितली. त्यानुसार घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी अर्भकाला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवले. तसंच याबाबत पोलिसांनी अज्ञात व्यक्तिवर गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

Loading Comments