अर्भक मृत्यूचा प्रश्न गंभीर

 Pali Hill
अर्भक मृत्यूचा प्रश्न गंभीर

मुंबई - मुंबईसारख्या विकसित शहरातही अर्भक मृत्यूचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पालिकेने दिलेल्या आकडीवारीनुसार पाच वर्षांत 2010 ते 2015 मध्ये तब्बल 29 हजार 609 अर्भकांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या राजधानीत सरासरी दिवसाला 13 अर्भकांचा मृत्यू होणे ही चिंतेची बाब असल्याचे मत व्यक्त होत आहे. अनेक वेळा खाजगी रुग्णालायापेक्षा सरकारी दवाखान्यात योग्य सुविधा मिळताना दिसत नाही. त्यामुळे सरकारने आता अर्भक मृत्यू दर कमी करण्यासाठी योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे.

Loading Comments