SHARE

कांदीवली पूर्व येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर शुक्रवारी रात्री दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दोन क्लिनरचा जागीच मृत्यू झाला तर ड्रायव्हर गंभीर जखमी आहे. जखमीला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर काही तासांसाठी वाहतूक कोंडी झाली. मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही ट्रक मासे घेऊन क्रॉफर्ड मार्केटला जात होते. त्यानंतर हे दोन्ही ट्रक कर्नाटकला जाणार होते. मात्र कांदीवली क्राॅस करताना पुढच्या ट्रकचा ताबा सुटला आणि तो मागून येणाऱ्या ट्रकला धडकला. या प्रकरणी अधिक तपास समतानगर पोलीस करत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या