फेसबुकवरील मैत्री पडली महागात

पैशासाठी तरुणींना ब्लॅकमेल करणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. करण गायकवाड (२३) असे या तरुणाचे नाव आहे. एका २१ वर्षीय तरुणीला फसवल्या प्रकरणी तिने पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर करणला अटक केली आहे.

फेसबुकवरील मैत्री पडली महागात
SHARES

फेसबुकवरून तरुणींना आपल्या प्रेमांच्या जाळ्यात ओढत, त्यांचा विश्वास संपादन करून शारीरिक संबध ठेवून कालांतराने पैशासाठी ब्लॅकमेल करणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. करण गायकवाड (२३) असे या तरुणाचे नाव आहे. एका २१ वर्षीय तरुणीला फसवल्या प्रकरणी तिने पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर करणला अटक केली आहे.


संपूर्ण प्रकार

घाटकोपर आपल्या कुटुंबियांसोबत राहणारी २१ वर्षीय तरुणीची काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर करणशी ओळख झाली होती. कालांतराने दोघेही एकमेकांचे चांगले मित्र बनले. पुढे करणने तरुणीला विश्वासात घेऊन त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. विविध कारणे देऊन करण तरुणीजवळ पैशांची मागणी करायचा. मात्र प्रेमात संतूलन हरवून बसलेली तरूणी देखील त्याला पैसे देत होती.


तरुणीवर अत्याचार

काही दिवसांपूर्वी करणने तरुणीला विक्रोळीच्या कन्नमवार नगर येथील इमारतीजवळ भेटायला बोलावले. त्यावेळी त्याने तिच्याकडे शारिरीक संबधासाठी आ्ग्रह केला. तरुणीने त्यास नकार दिल्यानंतरही लग्नाचं आमीष दाखवून करणने मुलीवर अत्याचार केले.


बदनाची धमकी

कालांतराने करण तरुणीकडे पैशांची मागणी करू लागला. तसेच तरुणीने लग्नासाठी तगादा लावल्यानंतर करण उडावा उडवीची उत्तरे देऊन बदनामी करण्याची धमकी देऊ लागला.


मुलीची फसवणूक

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर शुक्रवारी तरुणीने या प्रकरणी विक्रोळी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर विक्रोळी पोलिसांनी भादंवि. ३७६, ४२० कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा