अंबरनाथमध्ये २१ वर्षीय तरुणाची हत्या, ५ आरोपींना अटक

भाविक शिंदे हा उल्हासनगरच्या कॅम्प ४ मधील ब्राम्हणपाडा भागात राहत होता. भाविक आपल्या मित्रांसोबत तिथे बसला होता.

अंबरनाथमध्ये २१ वर्षीय तरुणाची हत्या, ५ आरोपींना अटक
SHARES

जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून २१ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. भाविक शिंदे असं मृत तरुणाचं नाव आहे. मंगळवारी रात्री ही घटना अंबरनाथ पूर्वेच्या शिवमंदिर परिसरातील शाळेजवळ घडली. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासातच ५ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

भाविक शिंदे हा उल्हासनगरच्या कॅम्प ४ मधील ब्राम्हणपाडा भागात राहत होता. भाविक आपल्या मित्रांसोबत तिथे बसला होता. तिथे आलेल्या काही जणांनी जुन्या भांडणांचा राग मनात धरून भाविक याला मारहाण केली आणि धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. 

हत्येनंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. तर या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी बुधवारी दुपारी अटक केली. यापैकी चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग होता का, तसंच भाविकांची हत्या नक्की जुन्या वादातून झाली का याचा तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा