बेपत्ता मुलांचा शोधणाऱ्यांना मिळणार २५० रुपये बक्षीस

ल्पवयीन मुलांचं बेपत्ता होण्याचं प्रमाण रोखण्यासाठी पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी एक विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत, पोलिसांच्या समाजसेवा शाखेचे अधिकारी, स्थानिक पोलिस ठाण्यातील बालसाह्य पथकांचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी बेपत्ता मुलांचा शोध घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास २५० रूपये वाढीव भत्ता बक्षीस आणि वार्षिक शेरा देण्याचं जाहीर केलं.

बेपत्ता मुलांचा शोधणाऱ्यांना मिळणार २५० रुपये बक्षीस
SHARES

सुमारे सव्वाशे कोटी लोकसंख्या असणाऱ्या मुंबईत लहान मुले-मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यापैकी अनेक बेपत्ता मुलांना कालांतराने बालगुन्हेगारी किंवा भीक मागायला लावलं जातं. त्या पार्श्वभूमीवर बेपत्ता मुले व मुलींचा शोध घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला यापुढे खात्यातर्फे २५० रुपये बक्षीस आणि गुणवत्ता शेरा देण्याचं मुंबई पोलिसांनी ठरवलं आहे.


लहान मुलांना पळवणाऱ्या टोळ्या सक्रिय

मुंबईत बेपत्ता मुला-मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मुला-मुलींचं अपहरण करून त्यांना भीक मागायला लावणं,  अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या टोळ्यांचा मनसुभा अनेकदा पोलिसांनी उधळून लावला आहे. मात्र काही दिवसांनी पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यानंतर हे अपहरणकर्ते पुन्हा सक्रिय होतात. बेपत्ता झालेल्या मुला/मुलींची वाढती संख्या पाहून न्यायालयानेही पोलिसांना अनेकदा फटकारलं आहे.

जानेवारी २०१७ ते सप्टेंबर २०१७ मध्ये ७७३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी ५६७ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं. मात्र, मागील वर्षातल्या बेपत्ता मुलींची संख्या धरून ५०० हून अधिक मुली अद्याप बेपत्ता आहेत. मागील वर्षी याच महिन्यामध्ये बेपत्ता मुलींची संख्या ६६१ होती. मुंबईतून बेपत्ता झालेले अनेक जण देशाच्या कोनाकोपऱ्यात आखातात लुप्त झाले आहेत. त्यांच्या पालकांचा आजही आक्रोश सुरू असला तरी पोलिस आणि सरकार त्यावर फार गंभीर दिसत नाही. मात्र हेच प्रकरण जर उच्चभ्रू वस्तीतील असेल, तर त्याला शोधण्यासाठी पोलिस सर्व शक्तीनिशी प्रयत्न करतात.


आयुक्तांनी दिले आदेश

या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांचं बेपत्ता होण्याचं प्रमाण रोखण्यासाठी पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी एक विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत, पोलिसांच्या समाजसेवा शाखेचे अधिकारी, स्थानिक पोलिस ठाण्यातील बालसाह्य पथकांचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी बेपत्ता मुलांचा शोध घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास २५० रूपये वाढीव भत्ता बक्षीस आणि वार्षिक शेरा देण्याचं जाहीर केलं. या अधिकाऱ्यांच्या कामाला गती मिळण्यासाठी त्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप बनवून त्यावरून बेपत्ता मुलांविषयीची माहिती घेऊन त्यांना शोधण्याचे आदेश आयुक्तांकडून देण्यात आले आहेत.


टोळ्यांचे धागेदोरे देशभर  

मुंबईतून बेपत्ता होणाऱ्यांमध्ये बहुतेक जण १८ ते ४९ वर्ष वयोगटातील आहेत. त्याचा वापर देहव्यापारात, आखाती देशातील वेश्या व्यवसायात आणि उर्वरितांचा घरकामासाठी केला जातो. गेल्या दोन वर्षांत हजारो महिला बेपत्ता झाल्या असून अशा कामांसाठी त्यांना अडकवण्यात आल्याचं कळतं. मुलांना परदेशात घरकामांना किंवा कंपन्यांमध्ये पाठवलं जातं. तर काहींना अंपग बनवून त्यांना भीक मागायला लावलं जातं. अल्पवयीन मुलींना विशिष्ट औषधे देऊन तसेच शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्या शरीररचनेत बदल करून त्यांना वेश्या व्यवसायात ढकलले जातं. मात्र शरीरात करण्यात आलेल्या बदलांमुळे त्यांची आयुर्मयादा कमी होऊन, तरुण वयातच मृत्यू ओढवण्याची अनेक प्रकरणे आहेत. तर, वेश्या व्यवसायात होणाऱ्या शोषणातून त्या अनेक आजारांनाही बळी पडतात.


दलालांचे जाळे

गावाकडील हे दलाल मुलांच्या कुटुंबीयांच्या परिचयाचे असतात. राज्याबाहेर ज्या ठिकाणांहून ही मुले आणली जातात, त्या ठिकाणी असणारे दारिद्रय, बेरोजगारी, मोठी कुटुंब, कुपोषण, अतिपाऊस वा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दलाल या मुलांच्या आई-वडिलांच्या मनात मुंबईतल्या जगण्याचे एक शानदार चित्र निर्माण करतात. त्याने मुंबईत सुरुवातील काढलेले फोटो दाखवत राहतो. त्या कुटुंबाचा विश्वास मिळवून, या फसव्या जाळ्यात गुंतलेले पालक मुलांना त्यांच्या सोबत पाठवतात. तर अनेकदा दुसऱ्या मुलांनाही याच दुष्टचक्रात ढकलतात. पुन्हा त्या गावाकडे तोंड दाखवत नाही किंवा दलाल त्या गावचा असेल तर मुलांची ख्याली खुशालीची पत्रे, पाठवून पालकांची फसवणूक सुरू असते.

नोटांबदीनंतर मालाड, मालवणी, कुरारसारख्या भागातील काचकारखान्यांमध्ये, धारावीतल्या जरीकामामध्ये मंदीचे सावट आले. अशावेळी हातात असलेल्या या मुलांचं करायचं काय? म्हणत कारखान्यांसाठी आणलेल्या मुली कामाठीपुऱ्याच्या रस्त्यावरही विकल्या गेल्याचे भीषण वास्तव तपासात पुढं आलं आहे. शहरातल्या वेश्या व्यवसायात एक नजर टाकल्यास त्यामधील अनेक मुली या पश्चिम बंगाल, म्यानमार, ओडिया आणि बांगलादेश आहे. 

घरात परिस्थिती बिकट असल्यामुळे अनेक दलाल त्यांना मुंबईला चांगल्या पगाराच्या नोकरीवर ठेवतो, शिक्षणासाठी नेतो असे सांगून वेश्या व्यवसायात ढकलत असल्याचे तपासात पुढं आलं आहे. अनेकदा शहरातील या दलालांच्या तावडीतून सुटका केलेल्या मुलींना त्यांच्या घरातले स्वीकारत नाहीत. आणि स्वीकारलेच तरी त्यांच्याशी लग्न करण्यास कुणी ही पुढे येत नाही. त्यामुळे त्यांचे भविष्य हे कायम काळोख्या अंधारातच जातं.


२०१७ मधील विशेष कारवाई

या वर्षातील जून महिन्यापर्यंत पोलिसांनी केलेल्या कारवाईत १८९ गुन्हे नोंदवले असून १७९ जणांना लहान मुलांना कामावर ठेवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातून २५२ मुलांची सुटका करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे मुलांना भीक मागायला प्रवृत्त करणाऱ्या ३९ जणांना अटक करून त्यातील ३५ जणांविरुद्ध गुन्ह्यांची नोंद झाली असून ७२ मुलांची सुटका समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा