26/11 Attack : सागरी ‘रडार’ यंत्रणा दुरुस्तीविना अडगळीत ! देशातील ३८ ठिकाणी रडार यंत्रणा तैनात

तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते या रडार यंत्रणेचे अनावरण करण्यात आले होते. मात्र, सद्यस्थितीत या रडारमधील एकही यंत्रणा कार्यरत नसल्याची माहिती तटरक्षक दलातील वरिष्ठ अधिका-याने दिली

26/11 Attack : सागरी ‘रडार’ यंत्रणा दुरुस्तीविना अडगळीत ! देशातील ३८ ठिकाणी रडार यंत्रणा तैनात
SHARES

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर २०१२ मध्ये  सागरी सुरेच्या दृष्टीने  किना-यांवर रडार यंत्रणा बसविण्यात आली. मात्र ही रडार यंत्रणाच नादुरुस्त होऊन अडगळीत पडली असल्याची धक्कादायक महिती समोर आली आहे. तर अशातच ही रडार यंत्रणा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय गुप्तचर विभागाने नोदलाला दिली आहे.

हेही वाचाः- 26/11 mumbai attack : सायबर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, सायबर गुन्ह्यात मुंबई २ क्रमांकावर

नेमके याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी तटरक्षक दल आणि नौदलाच्या मदतीने सागरी किनारपट्टीच्या हद्दीत तैनात असलेल्या रडार यंत्रणांभोवती कडक बंदोबस्त ठेवला आहे. तसेच या रडार यंत्रणेसाठी आवश्यक तो निधी पुरवठा तत्काळ करण्यात यावा याकरीता, २० सप्टेंबर २०१८ ला राज्य तसेच केंद्र सरकारला राज्य पोलिस, तटरक्षक दल  आणि नौदलाने प्रस्ताव पाठवुन साकडे घातले आहे. यापुर्वी २०१४ आणि २५ ऑक्टोंबर २०१५, २०१६ ला देखील असाच प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र अद्याप त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तारापूर, देवगड, टोळकेश्वर आणि गिरगाव या ठिकाणी २०१२ मध्ये सागरी सुरक्षेकरीता रडार यंत्रणा बसविण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते या रडार यंत्रणेचे अनावरण करण्यात आले होते. मात्र, सद्यस्थितीत या रडारमधील एकही यंत्रणा कार्यरत नसल्याची माहिती तटरक्षक दलातील वरिष्ठ अधिका-याने दिली. तसेच तत्कालीन संरक्षणमंत्री ए. के. अॅन्टोनी यांच्या हस्ते देशातील ३८ ठिकाणी बसविण्यात आलेल्या रडार यंत्रणांचा २५ ऑगस्ट २०१२ मध्ये शुभारंभ करण्यात आला होता. त्यावेळी गुजरात, दीव-दमण येथे रडार यंत्रणा बसविण्यात आली होती.

हेही वाचाः- 26/11 Mumbai attack : राज्यात बॉम्बनाशक पथकांचे चार प्रस्ताव सरकारी लाल फितीत

खोल समुद्रात शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांचे संदेश पकडण्यासाठी ही रडार यंत्रणा काम करणार होती. यासाठी या यंत्रणेत नेटवर्क कॅाम्प्रेझींग स्टॅटीक रडार आणि इलेक्ट्रो ऑप्टीक सेन्सरचे ८४ नियंत्रण कक्ष स्थापन केले होते. मात्र, यातील एकही रडार यंत्रणा कार्यान्वित नाही. पॅराशूटच्या सहाय्यानेच ही रडार यंत्रणा उद्ध्वस्त करण्याचा घातकी कट आखल्याची माहिती यापूर्वीच नौदल, मुंबई पोलीस आणि तटरक्षक दलाला मिळाल्याने या यंत्रणा सतर्क  आहेत. यापूर्वी मुंबई आणि रत्नागिरी येथील किना-यांवर जवळपास तीन मोठी जहाजे भरकटत आली असताना देखील त्याचा तपास ना या रडार यंत्रणांना लागला ना सागरी पोलिसांना. त्यामुळे सागरी सुरक्षेसाठी कार्यन्वित केलेल्या रडारांच्या क्षमतेत  कमतरता असल्याचे आढळून आले होते.

सागरी रडार कशापकारे करते काम ?

सागरी किना-याच्या सुरक्षेसाठी आणि शत्रुंच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने रडार यंत्रणा कार्यान्वित केली. ही यंत्रणा शत्रूंचे सांकेतिक संदेश पकडून त्यांची माहिती तटरक्षक दलाला देतात. त्यानुसार तटरक्षक दल सांकेतिक भाषांमध्ये पकडलेले संदेश हे मुंबई पोलीस आणि पश्चिम विभागीय नौदलाकडे पाठविण्याचे काम करतात. यामुळे शत्रू आणि दहशतवादी यांच्या हालचाली समजण्यास मदत होते. तसेच, एखाद्या मशिनवर या रडारच्या लहरी जरी आदळल्या तरी त्याचा धोका या रडारमध्ये असलेल्या नेटवर्क कॉम्प्रेझींग सेन्सरच्या माध्यमातून समजतो. मात्र,  या रडारच्या स्थापनेपासून शत्रूच्या हालचाली तर सोडाच. भरकटलेल्या जहाजांची माहितीदेखील ही रडार यंत्रणा देऊ शकली नाही. त्यामुळे सागरी सुरक्षेसाठी तैनात केलेली रडार यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा