गोवंडीत सेप्टिक टँकमध्ये गुदमरून तीन मजुरांचा मृत्यू

गोवंडी येथील रहेजा कॉम्पलेक्सजवळ गणेशवाडीत तीन खासगी मजूर साफसफाईचं काम करत होते. यावेळी ते सेप्टिक टँकमध्ये अडकले.

गोवंडीत सेप्टिक टँकमध्ये गुदमरून तीन मजुरांचा मृत्यू
SHARES

सेप्टिक टँक स्वच्छ करत असताना तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना गोवंडी येथे घडली. साफसफाई करताना गुदमरल्याने तिघांना शताब्दी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचं तेथील डाॅक्टरांनी सांगितलं. 

मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. गोवंडी येथील रहेजा कॉम्पलेक्सजवळ गणेशवाडीत तीन खासगी मजूर साफसफाईचं काम करत होते. यावेळी ते सेप्टिक टँकमध्ये अडकले. त्यामुळे गुदमरून त्यांच्या मृत्यू झाला. नालासोपारा येथे मे २०१९ मध्ये असाच तीन मजूरांचा साफसफाई करत असताना सेप्टिक टँकमध्ये गुदमरून मृत्यू झाला होता. तर याच महिन्यात ठाण्यातील ढाकोली भागात मजुरांचा मृत्यू झाला होता. 

मुंबई आणि आसपासच्या परिसरात अशा प्रकारे सेप्टिक टँकमध्ये अडकून मृत्युमुखी पडणाऱ्या कामगारांचं प्रमाण वाढत असल्याची बाब एका जनहित याचिकेद्वारे न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आली आहे. १७ डिसेंबर रोजी मुंबई हायकोर्टाने या जनहित याचिकेवर सुनावणी देताना राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 



हेही वाचा -

'या' दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत दारु विक्रीची परवानगी

मुख्यमंत्र्यांवर फेसबुकवर कमेंट करणं पडलं भारी, शिवसैनिकांनी तरुणाचं केलं मुंडन




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा