Advertisement

'या' दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत दारु विक्रीची परवानगी

राज्यातील मद्य विक्री दुकानांना 'या' दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी सरकारनं दिली आहे.

'या' दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत दारु विक्रीची परवानगी
SHARES

३१ डिसेंबरला तळीरामांचा उत्साह हा उल्लेखनीय असतो. या मंडळींचा हाच उत्साह लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारतर्फे एक न्यू इयर गिफ्ट देण्यात आलं आहे

२४ डिसेंबरला तसंच नाताळ म्हणजे २५ डिसेंबरला आणि नवीन वर्षाच्या रात्री म्हणजेच ३१ डिसेंबरला पहाटे ५ वाजेपर्यंत दारु विक्रीची परवानगी दिली आहे. राज्यातील मद्य विक्री दुकानांना नाताळा आणि न्यू इयरला पहाटे ५ वाजेपर्यंत दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी सरकारनं दिली आहे. असं असलं तरी यादिवशी खरेदी करताना ग्राहकांनी सर्तक रहावं असं आवाहनही सरकारनं केलं आहे.

अधिकृत दुकानं अनेकदा बंद झाली तरी विना परवाना चालणाऱ्या दुकानातून अनेक ग्राहक दारू खरेदी करतात. या मालाचा दर्जा विश्वसनीय नसतो. त्यामुळे शरीरावर अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतो. हे होऊ नये तसंच आर्थिकी दृष्ट्या दारू विक्रेत्यांना फायद्याचं ठरावं याकरिता या खास दिवशी दारू विक्रीला पहाटेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली गेली आहे.

सध्या दररोज दारू विक्री करणारी दुकानं रात्री ११ ते १२ पर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी आहे. तर परमिट रूम १.३० वाजेपर्यंत सुरू ठेवली जातात. पण ही सवलत नवीन वर्षाच्या पार्टीच्या दिवशी देण्यात आली आहे. याशिवाय दारू विक्री मान्य असली तरी मद्यपान करण्याच्या नियमात कुठेही सवलत दिलेली नाही. नियमानुसार मद्यपींनी परमिट रूममध्ये किंवा घरातच मद्यपान करावं. सार्वजनिक ठिकाणी असे प्रकार केल्यास ५००० पर्यंतचा दंड किंवा सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो.



हेही वाचा

‘थर्टी फस्ट’साठी बनावट दारू मुंबईत


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा