COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

वृत्तपत्राच्या ऑनलाइन साईटवर आक्षेपार्ह लिखाण करताय? मग हे वाचा

शेजारी राहणाऱ्या ७१ वर्षीय काकांना धडा शिकवणं एका तरूणाला चांगलंच महागात पडलं. काकांना गुन्ह्यात अडकवण्याच्या नादात स्वत: पोहोचला तुरुंगात.

वृत्तपत्राच्या ऑनलाइन साईटवर आक्षेपार्ह लिखाण करताय? मग हे वाचा
SHARES

मुंबईतल्या एका प्रसिद्ध मराठी वृत्तपत्रांच्या संकेतस्थळावरील बातम्यांखाली आक्षेपार्ह मजकूर वारंवार टाकणाऱ्या 31 वर्षीय तरुणास आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धेश खापरे (३१) असं या आरोपीचं नाव आहे. आपल्या शेजारी राहणाऱ्या काकांना धडा शिकवण्यासाठी खापरेनं त्यांच्या नावानं बनावट खाती तयार केली होती. त्याद्वारे आक्षेपार्ह पोस्ट करत असल्याची कबूली त्यानं पोलिसांना दिली आहे. मागील एका वर्षापासून तो या पोस्ट करत असल्याचं तपासात पुढे आलं आहे

नेमक काय प्रकार घडला?

मुंबईतल्या एका प्रसिद्ध मराठी वृत्तपत्राच्या ऑनलाइन साईटवर खापरे हा २०१८ पासून आक्षेपार्ह पोस्ट करत होता. सुरूवातीला संबधित ऑनलाइन न्यूज पोर्टलच्या संपादकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र काही दिवसांनी खापरेनं धार्मिक, जातीय तेढ निर्माण होईल, असं लिखाणही करण्यास सुरुवात केली होती. एका राजकीय पक्षाच्या विरोधातही या संकेतस्थळावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. याप्रकरणाचे गांभीर्य ओळखून न्यूज पोर्टलच्या संपादकांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात केली.

पोलिस तपासात बातम्यांखाली असलेल्या प्रतिक्रिया पडताळून पाहिल्या असता काही प्रतिक्रियांमध्ये साम्य आढळून आलं. संबधित खात्याचा आयपी अॅडरेस पडताळून पाहिला गेला. त्यावेळी  या सर्व आक्षेपार्ह पोस्ट एकाच आयपी अॅड्रेसवरून केल्या जात असल्याचं निदर्शनास आलं. पोलिस तपासात खापरेनं अशा प्रकारे १४० बनावट खाती शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या नावानं उघडल्याचं पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्याला ४१९ (तोतयागिरी), २९५(अ)(धार्मिक तेढ निर्माण करणे), ५०० (बदनामी करणे), ५०७ (तंत्रज्ञानाचा गुन्ह्यात वापर), ३४ (सामाईक इरादा) भा.द.वि व तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याच्या कलम ६६ "क' व "ड' अन्वये गुन्हा नोंदवत अटक केली.
 

काकांना धडा शिकवणे पडलं महागात 

शेजारी राहणाऱ्या 71 वर्षीय काकांसोबत त्याचं पटत नव्हतं. मात्र मोठे असल्यामुळे त्यांना काही बोलता ही येत नव्हतं. खडूस काकांना धडा शिकवण्यासाठी खापरेनं त्या काकांच्या नावानं आक्षेपार्ह पोस्ट करायचा. एक दोन नव्हे तर तब्बल १४० बनावट खाती त्यानं उघडली होती. यात एक खाते संबधित वृत्तपत्राच्या संपादकाचंही असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. याप्रकरणी आता आझादमैदान पोलिस अधिक तपास करत आहेत.हेही वाचा

शाळेचा बनावट दाखला देऊन पालिकेची नोकरी मिळवणारा अटकेत
रवि पुजारीची ‘कुंडली’ तयार
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा