गोवंडीतून ३३ लाखांचा गांजा जप्त, मुंबई पोलिसांची धडक कारवाई


गोवंडीतून ३३ लाखांचा गांजा जप्त, मुंबई पोलिसांची धडक कारवाई
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेट समोर आले. त्यानंतर महाराष्ट्रात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांची मुंबई पोलिसांनी धरपकड सुरू केली. नुकतीच मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधा पथकाने गोवंडीतून ३३ लाखांचा गांजा हस्तगत केला आहे. तर घटनास्थळावरून पोलिसांनी ६६ ड्रग्जच्या गोळ्या देखील ताब्यात घेतल्या आहेत. या प्रकरणी एएनसीचे पोलिस अधिक तपास करत आहेत.

घाटकोपर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोवंडीच्या शिवाजीनगर भागात ANC ने केलेल्या छापेमारीत ६६ हजार ड्रग्ज पिल्स जप्त करण्यात आल्या आहेत. ज्याची किंमत जवळपास ३३लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींनी अटक केली आहे.  याबाबत चौकशी सुरु असून पोलिस अधिक तपास करत आहेत. मागील महिन्यात पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) मोठ्या प्रमाणात पोलिसांनी कारवाई केली होती. या कारवाईत पोलिसांनी ५ जणांना अटक करुन त्यांच्याकडून २० किलोचा ड्रग्जसाठा (Drugs) जप्त केला. याची किंमत सुमारे २० कोटी इतकी आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जमध्ये मेफेड्रॉन (Mephedrone) आणि म्याव म्या ड्रग्जचा समावेश आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा