इमारतीच्या बांधकामादरम्यान विट पडून पादचाऱ्याचा मृत्यू


इमारतीच्या बांधकामादरम्यान विट पडून पादचाऱ्याचा मृत्यू
SHARES

इमारतीचे बांधकाम सुरु असताना विट पडून एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दक्षिण मुंबईत घडली. या अपघातात भावेश व्यास (३५) नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात कॉन्ट्रॅक्टर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या कॉन्ट्रॅक्टर आणि मजुरांना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू असल्याची माहिती डोंगरी पोलिसांनी दिली आहे.


कॉन्ट्रॅक्टरसह काही मजुरही पोलिसांच्या ताब्यात

अंधेरीत रहाणारे भावेश व्यास हे दक्षिण मुंबईच्या केशवजी नाईक मार्गावर थांबले असताना अचानक त्यांच्यावर काळाने घाला घातला. भावेश उभे असलेल्या शेजारीच एका इमारतीचं काम सुरू होतं. त्याचवेळी इमारतीवरून एक विट खाली पडली. ही विट भावेश यांच्या शेजारी उभी असलेल्या एका टेम्पोला आपटून थेट भावेश यांच्या चेहऱ्यावर आदळली. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होऊ लागल्याने तिथल्या स्थानिकांनी त्यांना तातडीनं जे. जे. रुग्णालयात नेलं. मात्र तोवर त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी डोंगरी पोलिसांनी कॉन्ट्रॅक्टरविरोधात गुन्हा दाखल करत कॉन्ट्रॅक्टरसह काही मजुरांना डोंगरी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतं.

संबंधित विषय