शौचालयाच्या टाकीत पडून चिमुरडीचा मृत्यू


शौचालयाच्या टाकीत पडून चिमुरडीचा मृत्यू
SHARES

पिंपरीपाडा - गोरेगावमधील कुरार पिंपरीपाडा येथे शौचालयाच्या टाकीत पडून एका 4 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घटलीय. आस्था कमलेश पाल असं या चिमुरडीचं नाव आहे. मंगळवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडलीय. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी जात चिमुरडीचा मृतदेह बाहेर काढला. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे कुरार पोलीस ठाण्याचे अधिकारी जगदीश गावीत यांनी सांगितलं. याआधी गोरेगावच्या प्रेमनगर परिसरात एका 4 वर्षाच्या मुलाचा शौचालयाच्या टाकीत पडून मृत्यू झाला होता.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा