चिमुरडीचा विनयभंग करणारा अटकेत

 Ghatkopar
चिमुरडीचा विनयभंग करणारा अटकेत

घाटकोपर - घरात कोणीच नसल्याची संधी साधत एका नऊ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या 55 वर्षीय आरोपीला घाटकोपर पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. गोपाळ नारायण असं या व्यक्तीचं नाव असून तो विक्रोळी अमृतनगर विभागातील गीतांजली सोसायटीमध्ये राहतो.

पीडित मुलगी ही आरोपीच्या घरी खासगी शिकवणीला येत होती. आरोपीची पत्नी ही या मुलीची शिकवणी घेत होती. बुधवारी ही मुलगी त्याच्या घरी शिकवणीला गेली असता आरोपीने या मुलीला अश्लील प्रकारे स्पर्श करीत तिचा विनयभंग केला. याबाबत मुलीने तिच्या घरच्यांना सांगितलं असता त्यांनी घाटकोपर पोलीस ठाणे येथे तक्रार दिली. त्यानुसार घाटकोपर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Loading Comments